कानूर/वार्ताहर
घटप्रभा नदीवरील फाटकवाडी प्रकल्प यावर्षी दोन आठवडे उशिरा भरले असून गेल्या दोन दिवसापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात 187 मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत १०५७ मी इतका पाऊस झाला आहे.
यावर्षी वर्षी पावसाने थोडा उशीर केल्याने व प्रकल्पाची डागडुजी करण्यासाठी यावर्षी संपूर्ण पाणी प्रकल्पावर सोडले होते दरवर्षी या प्रकल्पात मे अखेर 40 ते 45 टक्के या प्रकल्पात पाणीसाठा असायचा उर्वरित 50 ते 45 टक्केपावसाने लवकर भरायचा मात्र यावर्षी हा प्रकल्प 100 टक्के पावसाच्या पाण्याने भरला असून महाराष्ट्रात सर्वप्रथम धरण भरण्याचा मान यंदाही कायम ठेवला असून या प्रकल्पामुळे चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील गावांना याचा लाभ होणार असून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील वर्षी उद्भवणार नसल्याने शेतकरी सुखावला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प करण्यास मदत झाली काल हा प्रकल्प 73 टक्के इतका भरला होता मात्र 24 तासातील मुसळधार पावसामुळे 28 टक्के प्रकल्प भरला असून गेल्या 24 तासात 187 मी मी प्रजन्य वृष्टी नोंद झाली असून हा प्रकल्प भरण्यासाठी आंबोली आणि चौकुळ या गावावर लागणाऱ्या पावसाचाही उपयोग होत आहे.
गेल्या 48 तासात आंबोली चौकुळ गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात प्रजन्यवृष्टी होत आहे. मान्सून उशिरा सुरू होऊनही पावसामुळे हा प्रकल्प जरी भरला असला तरी घटप्रभा नदी अजून म्हणावे तशी भरून वाहत नाही मात्र येत्या काही दिवसात या प्रकल्पाच्या सांडव्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गांतून नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता असून पाऊस असाच संतधार सुरु राहिल्यास गटप्रभा नदी पात्रा बाहेर येण्याची शक्यता आहे.