Tarun Bharat

सीबीआय पोहचली कागलमध्ये, अन् केली चौकशी

पुण्यात नोकरी करणाऱ्या तरूणाच्या घरात दिवसभर पथकाचा डेरा

Advertisements

कागल/प्रतिनिधी

कागल शहरातील कमल-अनंतनगरमधील पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला असणाऱया तरुणाची सीबीआयच्या पथकाने शनिवारी चौकशी केली. रात्री आठ वाजता तो तरुण पुण्यातून कागलमध्ये आला. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. तरुणाने काढलेल्या ऑनलाईन अकाउंट संदर्भात ही चौकशी केल्याची चर्चा आहे.

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हे पथक त्या तरुणाच्या घरात तळ ठोकून होते. सामान्य कुटुंबातील तरूणाच्या चौकशी झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. मात्र सीबीआयसारख्या पथकाने या घरात नेमकी कशाची चौकशी केली याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. सीबीआयचे दोन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक हे पथक कागल शहरात पहाटे दाखल झाले. या पथकाने सुरुवातीला संबंधित तरुणाचे घर शोधण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर त्यांना हे घर सापडले. त्यानंतर हे पथक कागल पोलीस ठाण्यात गेले. तेथून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका महिला पोलीस कर्मचाऱयाला घेऊन पुन्हा हे पथक संबंधित कुटुंबाच्या कमल-अनंतनगरमधील घरात दाखल झाले. कोणालाही शंका येऊ नये म्हणून या पथकाने आपली इन्होव्हा कार घरापासून लांब उभी केली होती. दिवसभर महिला पोलीस कर्मचारी या कारमध्ये थांबून होती असे नागरिकांतून सांगण्यात आले.

हे ही वाचा : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

दिवसभर सीबीआयचे हे तिन्ही अधिकारी त्या घरात चौकशीसाठी करत होते. नेमकी कशाची चौकशी सुरू क्आहे, याबाबत कोणाला काहीही कल्पना नव्हती. मात्र पोलीस अधिकारी आल्याची कुणकुण गल्लीतील लोकांना लागली होती. त्यामुळे गल्लीत याबाबत दबक्या आवाजात चर्चा होती. रात्री उशिरापर्यंत हे अधिकारी संबंधित घरात थांबून होते. दरम्यान, रात्री आठ वाजता तो तरुण पुण्याहून घरी आला. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजते.

Related Stories

खोतवाडीत परप्रांतियांची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दगडफेक

Archana Banage

गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

Archana Banage

बँक योजनांसाठी जिल्ह्यातील बँकांचा मेळावा

Archana Banage

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री

Archana Banage

‘आरोग्य’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करा

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!