Tarun Bharat

राधानगरी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतचा निकाल दुपारी 2 वाजेपर्यंत अपेक्षित

राधानगरी/प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील 66 पैकी 58 ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या मतमोजणीची  जय्यत तयारी करण्यात आली असून एकूण 15 टेबलावर मतमोजणी  केली जाणार आहे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अंदाजे दुपारी वाजेपर्यंत सर्व  मतमोजणी पूर्ण होईल त्या दृष्टीने निवडणूक विभागाने नियोजन केले आहे ,प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार मीना निंबाळकर, निवडणूक विभागाचे कर्मचारी हे काम  पाहणार आहेत.

राधानगरी तालुक्यातील राधानगरी, कसबा तारळे, धामोड, कौलव,राशिवडे, घोटवडे, ठिकपुर्ली,या ग्रामपंचायती मोठ्या असून तालुक्याचे या निकालाकडे  लक्ष लागून राहिले आहे. येथील धान्य गोदाम इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात केली जाणार आहे एकूण 15 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे, यामध्ये
पहिल्या फेरीत करंजफेन, मल्लेवाडी, आटेगाव, केळोशी खुर्द, कारीवडे,
दुसरी फेरीत पिंपळवाडी, सुळंबी, घुडेवाडी, हसणे, ओलवन,
तिसरी फेरीत तरसंबळे,धामनवाडी,वाघवडे, खामकरवाडी, मोहडे,
चौथी फेरीत तळगाव,कासारपुतळे, कांबळवाडी,मुसळवाडी, मांगोली,
पाचव्या फेरीत टिटवे, मोघर्डे, सिरसे, कपिलेश्वर, मजरे कासारवाडा,
सहाव्या फेरीत आकनूर, पडळी, तारळे खुर्द, कुडूत्री,दुर्गमानवड,
सातव्या फेरीत राशिवडे खुर्द,कुंभारवाडी, पिरळ,मौजे कासारवाडा, कोते,
आठव्या फेरीत आवळी खुर्द, पुगाव,माजगाव, सावर्डे पाटणकर, आमजाई व्हरवडे,
नवव्या फेरीत सोन्याची शिरोली, अर्जुनवाडा, येळवडे, चांदे, चाफोडी तर्फे तारळे,
दहाव्या फेरीत शिरगाव,आवळी बुद्रुक, चंद्रे,आडोली,
आकरव्या फेरीत ठीकपुर्ली, धामोड,
बाराव्या फेरीत तुरंबे, कसबा तारळे,
तेराव्या फेरीत राशिवडे बुद्रुक, घोटवडे,
चौदाव्या फेरीत कौलव,बनाचीवाडी,
पंधराव्या फेरीत राधानगरी , अश्या प्रकारे मतमोजणी करण्यात येणार आहे

Related Stories

कोल्हापुरातील पूरस्थिती Live Update फक्त एका क्लिकवर : काळम्मावाडीतून १००० क्युसेक विसर्ग सुरु

Archana Banage

महाडिकांचे आगमन अन् भाषणाची दिशाच बदलली

Archana Banage

डॉ. आर. के. कामत, डॉ. एस. एस. महाजन यांची अधिष्ठातापदी निवड

Archana Banage

१२० आंतरजातीय विवाहितांना ५० हजारांचे अनुदान

Archana Banage

Kolhapur : उत्रेत गव्याच्या कळपाकडून पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

Abhijeet Khandekar

chittahproject;पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले

Archana Banage