Tarun Bharat

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाकडून अवाहन

कोल्हापूर : प्रतिनिधी

राधानगरी धरणाचे आज अखेर पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले झाले आहेत. तथापि, सर्व दरवाजे खुले झाल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरु नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे” असे आवाहन पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.

राधानगरी धरणाचे आतापर्यंत एकूण 5 दरवाजे (3, 4, 5, 6, 7) उघडले आहेत.या पाच स्वयंचलित दरवाज्यातून 7 हजार 140 क्यूसेक व पाॅवर हाऊसमधून 1600 क्यूसेक असा एकूण 8 हजार 740 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.

Related Stories

बालिंगेत विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Archana Banage

Kolhapur : सरनोबतवाडीतील हुक्का पार्लरवर छापा; नऊ जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

जिवाबनाना पार्क येथील उपोषणाला यश, प्रशासनाकडून मागण्या मान्य

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 7 जणांचा मृत्यू, 172 नवे रुग्ण

Archana Banage

राजोपाध्येनगर परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठ्यामूळे नागरिकांचे हाल

Archana Banage

पाटगाव परिसरात अतिवृष्टी , तिरवडे येथे घरांची पडझड

Archana Banage