राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या मतदानाची तयारी राधानगरी निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे. तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामधील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पूर्णता बिनविरोध झाल्या उद्या रविवारी 57 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या मतदानाची राधानगरी निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिली
57 ग्रामपंचायत निवडणूकी साठी राधानगरी तालुक्यातुन 211 मतदान केंद्रावर 1025 कर्मचारी व 100 राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.मतपेट्या व कर्मचारी यांना वाहतुकीसाठी राधानगरी आगारातुन 20 एस टी आणि गारगोटी आगारातुन 8 एसटी बसेस गाड्या २८ एसटी सह खाजगी वाहने यांचा समावेश आहे.राधानगरी पोलीस प्रशासनाने संवेदनशील ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात संचलन करून मतदान शांततेत करण्याचे आवाहन केले आहे