Tarun Bharat

कोल्हापुरात पावसाची जोरदार एंट्री; वादळी वाऱ्यासह गारपीट

Advertisements

कोल्हापूर: महाराष्ट्रात दोन दिवसात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.संध्याकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारपीटसह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान आज आजरा- चंदगड तालुक्याला सर्तकतेचा इशारा दिला होता.

कोल्हापुरात संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली. यावेळी महानगर पालिकेने सिंग्नलच्या स्पिकवर नागरिकांना सतर्कतेचे आव्हान केले. दरम्यान पावसाने शहरातील रस्त्यांनी तळ्याचे रुप धारण केले. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ जयंती नाल्याशेजारी झाड पडले आहे. त्यामुळे कसबा बावडा ते दसरा चौक मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. तरी अनेक भागात पाणी साचले आहे.दरम्यान शहरातील अनेक मार्गांवर झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राजारामपुरी दहावी गल्लीत गाडीवर झाड पडले. याचबरोबर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही झाड पडले, तर वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. शहरातील साने गुरुजी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, शाहूपुरी पोलीस ठाणे, हॉकी स्टेडियम, देवकर पानंद, सीपीआर चौक परिसरात पाणी साचले आहे. दरम्यान वादळी वाऱ्यांसह झालेला पाऊस हा धुळ वाफ पेरणीस उपयुक्त आहे.

सांगलीत वातावरणात गारवा
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, मिरज तालुक्यात सर्वाधिक 6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.तसेच सांगलीतील स्टेशन चौक, मारुती चौक आणि विस्तारित भागांमध्ये पावसामुळे पाणी साठवून राहिल्याने नागरिकांना या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये नोंदवण्यात आली. यामध्ये मिरज 6 (7.1), जत 0.4 (23.8), खानापूर-विटा 0.0 (3.3), वाळवा-इस्लामपूर 0.0 (0.9), तासगाव 0.4 (1.3), शिराळा 0.0 (0.3), आटपाडी 0.0 (5.5), कवठेमहांकाळ 0.0 (7.6), पलूस 0.0 (0.१), कडेगाव 0.0 (5.6) पाऊस झाला आहे.

कोल्हापुरात पावसाने झालेले नुकसान
शहरातील अनेक मार्गांवर जाड पडल्याच्या घटना
जयंती नाल्यावर झाड पडल्याने वाहतूक एकेरी मार्गाने
शहरातील साने गुरुजी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, शाहूपुरी पोलीस ठाणे, हॉकी स्टेडियम, देवकर पानंद, सीपीआर चौक परिसरात पाणी साचले
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही झाड पडले, तर वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत.
कळंबा परिसराला पावसाने झोडपले
तपोवन शाळेची 100 फुटापेक्षा जास्त संरक्षक भिंत कोसळली
भिंतीखाली झाडं गाडली गेल्याने वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींची धडपड
परिसरातील दोन वाहनांवर झाड उन्मळून पडल्याची घटना


Related Stories

समाज, कुटुंबाचा विचार करा : पोलीस अधीक्षक डॉ. बलकवडे

Archana Banage

उच्च वीज दाबाने वाकरेत घरगुती साहीत्य जळाले, चार लाखांचे नुकसान

Archana Banage

रायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० जण बेपत्ता

Archana Banage

…तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार : खा. उदयनराजे

datta jadhav

मुंबई-नागपाडा परिसरात मनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

Archana Banage

नवी मुंबईत सुरू होणार जिओ इन्स्टिट्यूट – नीता अंबानी यांची घोषणा

Archana Banage
error: Content is protected !!