Kolhapur Rain Update : कोल्हापुरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असून पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.
आज सकाळी राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. तर सायंकाळनंतर आणखी दोन दरवाजे उघडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वर्षी पाचव्यांदा धरणाचे दरवाजे खुले झाले आहेत. गेल्या चोवीस तासात ७९ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आजतागायत.३९१३ मी.मी पाऊस नोंदवला आहे. नदीपात्रात ३०२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तुळशी धरणाचाही विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.


previous post