कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ, कोल्हापूरतर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरची शाहिर दिप्ती दिलिप सावंत हिला ‘राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आज, गुरुवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
दिप्ती सावंत वयाच्या 9 व्या वर्षीच वडील शाहिर दिलीप सावंत यांच्या कडून शाहिरीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तसेच शाहिर लहरी हैदर, शाहिर विशारद पिराजीराव सरनाईक यांच्या परंपरेत शाहिर सादर करणारी दिप्ती सावंत ही ऑटोमोबाई इंजिनिअर आहे. ती राज्यभरात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, राजर्षि शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, अहील्याबाई होळकर यांच्या विचारांचा प्रसार आपल्या पोवाडय़ाच्या माध्यमातून करत आहे.