Tarun Bharat

वर्ल्ड स्कूल गेममध्ये नाधवडेच्या राजवर्धन पाटीलने घडविला इतिहास

देशाला मिळवून दिली दोन कास्यपदके; 400 मीटर अडथळा व 4X 100 अडथळा शर्यतीत तिसरा क्रमांक

कोल्हापूर प्रतिनिधी

फ्रान्समधील नॉरमेडी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये (जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा) कोल्हापूर जिल्ह्य़ातील नाधवडेचा धावपटू राजवर्धन पाटील याने इतिहास घडविला. ऍथलेटिक्समध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीत भारताला वैयक्तिक कास्यपदक मिळवून दिले. त्याचबरोबर 4 X100 मीटर अडथळा शर्यतीत कायस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय संघाचेही त्याने प्रतिनिधीत्व केले. वर्ल्ड स्कूल गेम्ससारख्या जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये पदक मिळविणारा राजवर्धन कोल्हापूर जिल्हय़ातील पहिला ऍथलिट ठरला आहे.

बिद्री येथील वेस्टर्न रिजन स्पोर्टस् फैंडेशन ऍथलेटिक्स क्लबचा खेळाडू असणाऱया राजवर्धनने फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी आपल्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला होता. भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याने प्रचंड परिश्रम घेतले होते. त्याचे फलित त्यांना पदकांच्या रूपाने लाभले. ऍथलेटिक्समधील 400 मीटर अडथळा शर्यतील युरोपियन, कॅरेबियन आणि आफ्रिकन देशातील धावपटूंशी स्पर्धा करत राजवर्धनने 54.07 सेकंदाची वेळ देत भारताला वैयक्तिक कास्यपदक मिळवून दिले. त्याचबरोबर 4 X100 मीटर अडथळा शर्यतीत भारतीय संघाने 43 सेकंद सांघिक कास्यपदक मिळवले. या शर्यतील ब्राझीलने सुवर्णपदक (वेळः 42.58 सेकंद), चायनीज तैपेईने रौप्य पदक (वेळः 42.62 सेकंद) मिळवले. भारतीय संघाने कास्यपदक मिळविताना कझाकिस्तान आणि चिली, प्रेंच पॉलीनेसिया (ग्रीस) या संघांना मागे टाकले. कास्यपदक विजेत्या भारतीय संघात राजवर्धनचाही समावेश होता. वैयक्तिक व सांघिक प्रकारात कास्य पदक मिळवून राजवर्धनने भारताचा झेंडा फडकविला आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचाही लौकिक वाढविला आहे.

नाधवडे गावचा सुपुत्र असणारा राजवर्धन पाटील हा बिद्री दूधसाखर विद्यानिकेतन मध्ये बारावी विज्ञानमध्ये शिक्षण घेत आहे. बिद्री कॉलेजच्या मातीच्या ऍथलेटिक्स टॅकवर तसेच शिवाजी विद्यापीठातील सिथेंटिक टॅकवर तो सराव करतो. त्याचे वडील अर्जुना पाटील हे कन्या शाळा गारगोटीचे प्राथमिक शिक्षक आहेत. वेस्टर्न रिजन स्पोर्टस् फैंडेशन ऍथलेटिक्स क्लबचे बिद्रीतील ऍथलेटिक्स प्रशिक्षक रामदास फराकटे आणि कोल्हापूरमधील ऍथलेटिक्स प्रशिक्षक अभिजित मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून राजवर्धन पाटील वर्ल्ड गेम्समध्ये सहभागी झाला आहे. राजवर्धननाला आई, वडिलांसह बिद्री दूधसाखर शाळेचे प्राचार्य आर. व्ही. पाटील, क्रीडा शिक्षक अभिजित पाटील, शारिरीक शिक्षण संचालक एन. डी. पाटील, नाधवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. डी. कांबळे, क्रीडा शिक्षक एन. एस. पाटील यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, क्रीडा विभाग प्रमुख पी. टी. गायकवाड यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले.

राजवर्धन आणि भारतींय संघाची कामगिरी
राजवर्धनने 400 मीटर अडथळा शर्यतीत (वैयक्तिक क्रीडा प्रकार) 54.07 सेकंदाची वेळ देत कास्यपदक मिळवले तर 4 X100 मीटर अडथळा शर्यतीत (सांघिक क्रीडा प्रकार) भारतीय संघाने 43 सेकंद वेळ देत कास्यपदक मिळवले. त्यात राजवर्धनचा सहभाग होता.या शर्यतीत ब्राझीलने 42.58 सेकंद वेळ देत सुवर्ण, चायनीज तैपेईने 42.62 सेकंद वेळ देत रौप्यपदक मिळवले. कझाकिस्तानचा संघ 43.37 सेकंद वेळ देत चौथ्या क्रमांकावर गेला.

Related Stories

भारतीय विद्यार्थी युक्रेन लष्करात कार्यरत; आई म्हणते…

Archana Banage

शासकीय योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहचवा

Archana Banage

निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षाची चिन्हच ठरते ओळख !

Archana Banage

युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी

Archana Banage

कोविड सेंटरच्या शाळा चालकांना पालिकेचा ‘झटका’ ?

Archana Banage

लॉकडाऊनचा फटका बसलेल्या मजुरांना शिक्षकाची मदत

Archana Banage
error: Content is protected !!