Tarun Bharat

चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच मतदानाची रणनीती बदलली असल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठीच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ इतका केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला मिळणारी दोन मते कमी होतील. तसे झाल्यास शिवसेनेचे संजय पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आता भाजपचा आत्मविश्वास दुणावण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक म्हणाले की, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठीच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केला असेल तर भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकलेत, हे आत्ताच जाहीर करायला हरकत नाही. सहाव्या जागेसाठी आम्हाला ११ ते १२ मतांची गरज आहे. आता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोटा वाढवला असेल तर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या उमेदवाराची मतं कमी होतील. तसे घडल्यास आमचा विजय हा निश्चित आहे. मात्र, एरवीही भाजपचा विजय हा निश्चितच होता. मला काल रात्री चांगली झोप लागली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अगदी योग्य रणनीती आखली आहे. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची जुळवाजुळव झाल्याचा दावा धनंजय महाडिक यांनी केला.

Related Stories

नाशिक : शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची होणार निवड

Archana Banage

“असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले”; मुख्यमंत्री ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

Archana Banage

इंग्रजी, हिंदी, उर्दु, संस्कृत, नेपाळीसह ‘सातबारा’ आता 22 भाषांमध्ये

Archana Banage

गुप्तीच्या धाकाने युवकांना लुटले

Patil_p

मॉस्कोतील बैठकीपूर्वी पँगाँगमध्ये भारत-चीन सैन्यांकडून गोळीबार

datta jadhav