Tarun Bharat

राखी ऐवजी बांधले शिवबंधन!

निष्ठेची मागितली ओवाळणी : शिवसैनिकाच्या भगिनीचे असेही रक्षाबंधन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाकी पडणार असे बोलले जात असताना तळागाळातील शिवसैनिक मात्र त्यांच्याबरोबरच असल्याचे चित्र आहे. आमदार, खासदार सोडून गेले तरी कट्टर शिवसैनिकाने मात्र ठाकरे यांनाच साथ दिली आहे. याचेच प्रत्यंतर रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने आले.

शिवसेना उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांच्या शिक्षिका असणाऱ्या भगिनी रूपाली संजय लोंढे गुरूवारी मिरजेहून आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आल्या खऱ्या, पण त्यांनी राखी ऐवजी शिवबंधनाचा धागा बांधत विशाल यांचे औक्षण केले. आजपर्यंत तू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी यांच्याबरोबरच राहिलास. यापुढेही या शिवबंधनाचा सन्मान राखत आयुष्यभर मातृसंस्था असणाऱ्या शिवसेनेशी निष्ठा ठेव, ही माझ्यासाठी ओवाळणी असेल, असे सांगत रूपाली यांनी विशाल यांना ओवाळले. या बहीण-भावांच्या या आगळ्य़ा वेगळ्य़ा रक्षाबंधनाची, शिवबंधनाची चर्चा शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली.

Related Stories

संजय भोसले यांची महापालिकेतील नियुक्त बेकादेशीर

Abhijeet Shinde

विट्यात पोलिसाला दुचाकीमागे फरफटत नेले

Abhijeet Shinde

पुणे फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात; लाखोंचे नुकसान

Rohan_P

कुंभी साखरच्या व्हाईस चेअरमनपदी निवास वातकर

Abhijeet Shinde

प्रक्रिया ठप्प… महा-ई-सेवा गप्प

Abhijeet Shinde

पदवीधर मधून विकास महाआघाडीचे अरुण अण्णा लाड यांचा अर्ज दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!