भीषण अपघातात एक गंभीर
हुपरी / वार्ताहर
रांगोळी येथील माळभाग मेन रोडवर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन रेंदाळ येथील विनायक प्रकाश परीट हा युवक जागीच ठार झाला. अपघातात दोन्ही मोटरसायकलचा चक्काचूर झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी माळभाग येथील मायकल कॉर्नर येथे रेंदाळून इचलकरंजी कडे विनायक प्रकाश परीट गाडी नंबर MH.09.BW.0277 हा इचलकरंजी कडे जात होता याचवेळी रांगोळी येथील सिद्धगोंडा पाटील गाडी नंबर MH 09.DG.2437 पेट्रोल टाकण्यासाठी रेंदाळ येथील पंपावर जात होते. यावेळी मायकल कॉर्नर येथे दोघांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे विनायक हा रस्त्यावरती जोरदार पडला व डोक्याला गंभीर इजा झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी 108 ॲम्बुलन्स मधुन अपघातात ग्रस्त दोघांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. यावेळी विनायकचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तसेच सिध्दगोंडा यांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मिथुन सावंत यांनी भेट देऊन पंचनामा करून पुढील तपास चालू केला.