Tarun Bharat

स्वच्छतेत कोल्हापूर घसरले, देशात १०४ नंबर

स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात दुसऱ्यावरून २० व्या क्रमांकावर : २०१९ मध्ये देशात होते १६ व्या स्थानी : हागणदारीमुक्त शहर नसल्याचा फटका, स्टार रेटींगमध्येही पिछाडीवर

विनोद सावंत/कोल्हापूर

महापालिका तीन वर्षापासून स्वच्छतेमध्ये फेल ठरत आहे. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दरवर्षी रँक घसरत चालला आहे. स्वच्छतेमध्ये 2019 मध्ये देशात 16 व्या तर राज्यात दुसऱया स्थानावर असणारे कोल्हापूर शहर यावर्षी देशात 104 तर राज्यात 20 व्या स्थानावर गेले आहे. कोंडाळामुक्त शहर करण्याचा संकल्प केलेल्या प्रशासनाला ही चपराक आहे.

केंद्राकडून देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जाते. यामध्ये चांगले काम करणाऱया महापालिका, नगरपालिकांना पुरस्कार दिले जातात. शहर स्वच्छ रहावे हा यामागील उद्देश आहे. 2016 पासून याची सुरवात झाली आहे. कोल्हापूर महापालिकेची 1 लाख ते 10 लाख लोकसंख्या असणाऱया मनपाच्या गटात केंद्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळावा यासाठी धडपड सुरू आहे. 169 टिपरच्या माध्यमातून घरोघरी कचरा उठाव, झुम प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱयापासून वीज निर्मिती, कोंडाळामुक्त शहर असे प्रकल्पही त्यांनी राबवले. यावर्षीही प्रशासनाने स्वच्छतेला प्राधन्य दिले होते. यंदाचे पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये कोल्हापूर शहर 4094.29 गुण मिळवून देशात 104 व्या तर राज्यात 20 व्या क्रमांकावर राहिले. देशात 382 तर राज्यातील 34 शहरांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जे शहर 2019 मध्ये स्वच्छतेमध्ये देशात 16 व्या क्रमांकावर होते. ते आज 104 क्रमांवर गेले असून हे खेदाचीबाब आहे.

हे ही वाचा : दसरा महोत्सवातून समतेचा संदेश पोहोचावा – श्रीमंत शाहू छत्रपती

रँक गेलाच, कोंडाळमुक्त शहरही नाही
महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात टॉपवर येण्यासाठी शहर कोंडाळामुक्तचा संकल्प केला. 1050 पैकी तब्बल 965 कोंडाळे काढले. टिपर वेळेवर येत नसल्याने नागरिक कोंडाळा काढलेल्या ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. याचा फटकाही बसला. परिणामी शहर 100 टक्के कोंडाळामुक्त नाही आणि स्वच्छतेमध्ये रँकही नाही, अशी स्थिती मनपाची आहे.

हागणदारीमुक्त शहर नसल्याचा फटका

अभिजित चौधरी महापालिकेचे आयुक्त असताना कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त झाले होते. याचवेळी स्वच्छतेमध्ये त्रिस्टार रँक प्राप्त झाला होता. यामुळेच कोल्हापूर शहर स्वच्छ सर्वेक्षणात टॉपवर राहिले. त्यानंतर स्वच्छतेमध्ये प्रशासनाला सातत्य ठेवता आले नाही. कचरा प्रकल्प काही महिने बंद राहिला. हागणदारीमुक्त शहर केलेले टिकवता आले नाही. यामुळेच यंदाही गुण कमी मिळाले असून रँक आणखी घसरला.

इंदोर शहराच्या अनुकरणाची गरज
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदोर शहर सलग सहाव्यांदा प्रथम आले आहे. या शहरामध्ये नेमके कशा प्रकारे स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांसाठी काय नियम, अटी केल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेतील संबंधित अधिकाऱयांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणातील मिळालेला रँक
वर्ष देशात राज्यात

2019 16 2
2020 32 8
2021 35 10
2022 104 20

Related Stories

वाकीघोल परिसराला जोडणारा रस्ता पुन्हा खचला

Archana Banage

ईडब्ल्यूएस आरक्षणातील जाचक अटीचा विद्यार्थ्यांना फटका

Archana Banage

Women’s Day Special : उंच कडा आणि त्याच उंचीची जिद्द, दोघींनी फक्त दोराच्या सहाय्याने चढला अजस्त्र कडा

Archana Banage

राधानगरी अभयारण्यात 5 व 6 मे रोजी प्राणी गणना, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांची माहिती

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीत खरेदीसाठी मोठी गर्दी

Archana Banage

आयपीएस शिवप्रतापसिंह यादव ते आयपीएस डॉ. अभिनव देशमुख !

Archana Banage
error: Content is protected !!