कोल्हापूर प्रतिनिधी
माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सागर बंगल्यावर सकाळी साडेअकरा वाजता संभाजीराजे दाखल झाले. फडणवीस यांच्याबरोबर त्यांची वीस पंचवीस मिनिटे चर्चा झाली. चर्चेतील तपशिल समजू शकला नाही.
दरम्यान, संभाजीराजे यांच्याशी या भेटीसंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, माझी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड होण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाही मोलाचा हातभार होता. त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी मी आज फडणवीस यांची भेट घेतली. भेटी दरम्यान झालेल्या चर्चेविषयी विचारले असता संभाजीराजे यांनी भाष्य करणे टाळले.