Tarun Bharat

संभाजीराजेंची राजकीय ‘वाट’‘चाल’ 12 तारखेला ठरणार!

पुण्यात जाहीर करणार भूमिका; राज्यभरात प्रचंड उत्सुकता

कोल्हापूर प्रतिनिधी

माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी आपण राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांची भविष्यातील नेमकी भूमिका, वाटचाल कशी असणार आहे? या बद्दल राज्यभरात उत्सुकता, कुतुहल आहे. त्यावर आज पडदा पडणार आहे. संभाजीराजे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील कार्यक्रमाची तयारी केली आहे.

गेली सहा वर्षे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून संभाजीराजे यांनी संसदेत जबाबदारी पार पाडली. जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविला. मराठा आरक्षणाच्या लढय़ाचे नेतृत्व त्यांनी केले. मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबत राज्य सरकारशी संघर्ष केला होता. त्यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण प्रभावी ठरले होते. राज्य सरकारलाही त्या उपोषणाची दखल घ्यावी लागली होती. शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगड साजरा करण्याची भूमिका गेली दोन दशके घेतलेल्या संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील शिवरायांच्या सर्व किल्ल्यांच्या, गडांच्या जतन, संवर्धनासाठी आपली ताकद पणाला लावली. त्यातून रायगडसह इतर गड, किल्ल्यांची कामांना निधी मिळाला, कामेही सुरू झाली. गेल्या 3 मे रोजी संभाजीराजे यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली. त्यानंतर ते कोणती भूमिका घेणार याबद्दल उत्सुकता आहे. ते काँग्रेस विचारधारेबरोबर जातील, अशीही चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी ‘आता महाराष्ट्राच्या भल्यासाठी’ ही टॅगलाईन घेऊन पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संभाजीराजे प्रत्यक्षात जी घोषणा करतील, त्या त्यांना कोणत्या वाटचालीने, भूमिकेने महाराष्ट्र हित साधायचे आहे, हे कळणार आहे.

Related Stories

खोटी माहिती पसरवण्यापेक्षा जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवा; प्रियांका गांधींची टूलकिटवरून भाजपवर टीका

Archana Banage

नवज्योत सिद्धू पंजाबची राखी सावंत !

Patil_p

हमीभाव नसल्याने शेतकऱ्याची गांजा लागवडीची मागणी

Archana Banage

गोवा राज्यात प्रवेशासाठी मार्ग खुले – मुखमंत्री प्रमोद सावंत

Archana Banage

स्वाभिमानीचे कार्यकर्ते जिल्हा बँकेत घुसले

Archana Banage

खोची येथील घटनेतील आरोपीविरोधात २२२ पानाचे दोषारोपपत्र दाखल

Archana Banage