तरुण भारत

पुरुषात दिल्ली, ओरिसा, गुजरातचे वर्चस्व राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा

महिलांत हरियाणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश वरचढ; शनिवार पासून बाद फेरीतील सामने

इस्लामपूर प्रतिनिधी

येथील लोकनेते राजारामबापू क्रीडानगरीत सुरु असलेल्या 24 व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुषांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात, तर महिलांच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत आपले वर्चस्व राखले. आज (शनिवार) पासून बाद फेरीतील सामने होणार असल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढत चालली आहे.

पुरुषांच्या दिल्ली विरुध्द राजस्थान, ओरिसा विरुध्द गुजरात, कर्नाटक विरुध्द गुजरात, तर महिलांच्या हरियाणा विरुद्ध राजस्थान, मध्य प्रदेश विरुद्ध बिहार, आंध्र प्रदेश विरुद्ध तामिळनाडू या संघात शेवटच्या सेटपर्यंत झुंज झाली. राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा सुरु आहेत.

दरम्यान पुरुषांच्या पंजाब व हरियाणा, ओरिसा व पॉंडीचेरी, उत्तर प्रदेश व कर्नाटक, झारखंड व तेलंगणा या संघातही जोरदार लढत होऊन पंजाब, ओरिसा, उत्तर प्रदेश व झारखंडने 3-1 सेटनी विजय मिळविला आहे. तसेच बिहारने झारखंड व मध्य प्रदेशला, दिल्लीने मध्य प्रदेशला, केरळने जम्मू काश्मीरला, तामिळनाडूने चंदीगढला, हिमाचल प्रदेशने पश्चिम बंगालला सरळ 3 सेटनी हरविले.

महिलांच्या हरियाणा संघाने बिहारला, केरळने चंदीगढ व कर्नाटकला, पश्चिम बंगालने झारखंडला, आंध्र प्रदेशने तेलंगणाला, गुजरातने तामिळनाडूला, चंदीगढने उत्तर प्रदेशला सरळ 3 सेटनी मात दिली. पहिले 3 दिवस पुरुषांच्या व महिलांच्या 4 गटात साखळी पद्धतीने सामने पार पडले आहेत. शनिवार पासून तुल्यबळ संघांच्यामध्ये बाद फेरीचे सामने होणार आहेत.

इस्लामपूरचा व्हॉलीबॉल खेळाचा समृध्द वारसा
इस्लामपूरच्या श्रावणी प्रताप पाटील, सुप्रिया जालिंदर साळुंखे या महाराष्ट्राच्या महिला संघातून खेळत आहेत. महंमद साब मुल्ला, स्व.सत्तारभाई खाटीक यांनी भारतीय संघातून, तर स्व.मधुकर पाटील, स्व.शिवाजी भोसले, स्व.संभाजी भोसले, कादर वाठारकर, बकस खाटीक यांच्यासह अनेक खेळाडूंनी राज्याच्या संघातून प्रतिनिधित्व केले आहे. एक काळ होता, देशाच्या संघात निम्मे खेळाडू या शहरातील होते. या शहराने यापूर्वी पाच वेळा राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा यशस्वीपणे घेतल्या आहेत. स्व.सुधीर पिसे यांनी राज्य संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. इस्लामपूर हे शहर व्हॉलीबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते.

देशातील सर्वोत्कृष्ठ आयोजन
या स्पर्धेत देशाच्या विविध 22 राज्यातील पुरुष व महिलांचे संघ, तसेच राज्य व राज्या बाहेरील पंच, प्रशिक्षक, देश व राज्याच्या संघटनेचे पदाधिकारी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या सर्वांनी प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे देशात सर्वोत्तम नियोजन केल्याची भावना व्यक्त करीत आहेत. क्रीडा रसिकांच्या उदंड प्रतिसादाबद्दलही समाधान व्यक्त केले जात आहे.

Advertisements

Related Stories

अखेर लालपरीने ओलांडली जिल्ह्याची सीमा

Abhijeet Shinde

पंजाब दारूबळींचा आकडा 86 वर

Patil_p

‘लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा’; नवनीत राणांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

Abhijeet Shinde

उत्तर बंगालची अर्थव्यवस्थेत मोठी हिस्सेदारी

Amit Kulkarni

1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

Rohan_P

‘जैश’च्या मॉडय़ूलचा काश्मीरमध्ये पर्दाफाश

Patil_p
error: Content is protected !!