Tarun Bharat

शाहू विचार जागर रथयात्रेला प्रारंभ; कोल्हापूर, सातारा, पुणे मार्गे मुंबईकडे कूच

गिरगावमध्ये बुधवारी शाहू स्मृतीस्तंभाचा लोकार्पण सोहळा; शाहू स्मृती शताब्दीनिमित्त आयोजन

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकाराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर ते मुंबई (गिरगाव) या मार्गावर शाहू विचार जागर रथयात्रेचे आयोजन केले आहे. आज मंगळवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता ही विचार जागर यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेतील रथ कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे, मुंबई मार्गावरील गावात शाहूंच्या विचाराचा जागर करत गिरगावपर्यंत (शाहू महाराजांचे निधन झालेले ठिकाण खेतवाडी, गिरगाव) कूच करणार आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचे लोकर्पण बुधवार 5 मे रोजी केले जाणार आहे.

शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या शाहू विचार जागर रथयात्रेला आज मंगळवारी सकाळी 9 वाजता शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटीलसो, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या ऐतिहासिक रथयात्रेचे स्वागत शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळ ही शिखर संस्था करणार आहे. विचार जागर रथयात्रा शाहूंच्या जन्मभुमीतुन निघणार असून समारोप मुंबई येथील गिरगाव येथे निधन खेतवाडी येथे होईल. ही माहिती शाहू स्मृती समितीचे अध्यक्ष वसंतराव
मुळीक व उपाध्यक्ष बबनराव रानगे यांनी दिली.

असा आहे….शाहू विचार जागर रथयात्रेचा मार्ग
यात्रा उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी,बिंदू चौक, महानगर पालिका, टाऊन हॉल, कसबा बावडा, हनुमान नगर शिये मार्गे टोप, वाठार, इस्लामपूर, पेठ नाका, कराड, सातारा येथे मुक्काम बुधवार 4 मे रोजी सकाळी रथयात्रा रवाना होणार असून कात्रज येथे सायं पाच वाजता पोहोचेल. त्या कात्रज येथे विविध संस्थांकडून स्वागत होईल. त्यानंतर शनिवार वाडय़ासमोर राजर्षी शाहू महाराजांनी महायुद्धात धारातिर्थी पडलेल्या सर्व समाजातील सैनिकांच्या उभारलेल्या स्मृती स्तंभाच्या ठिकाणी अभिवादन कण्यात येईल. तेथून ऑल इंडिया डीया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे ( या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील पहिला पुतळा राजर्षी शाहू महाराज यांनी उभा केला होता.) अभिवादन सभा होईल. तेथे मुक्काम. 5 मे रोजी सकाळी रथयात्रा सकाळी 7 वाजता मुंबईकडे रवाना होईल. दुपारी 12 चेंबूर येथे पोहचेल. तेथून सायंकाळी 4 वाजता खेतवाडी गल्ली नं 13,keÀeceeyeeie चौक, गिरगाव राजर्षी शाहू स्मृतीस्तंभ येथे पोहचेल. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत शाहू स्मृतिस्तंभ लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी लोकार्पण सोहळा पर्यावरण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व मालोजीराजे छत्रपती यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मुंबई महापालिका अधिकारी व माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या रथयात्रेत शाहूप्रेमीनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाहू स्मृती समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक व उपाध्यक्ष बबनराव रानगे यांनी केले आहे.

Related Stories

सातारा : जमिनीत अनाधिकाराने प्रवेश केल्याबद्दल पाचजणांविरोधात गुन्हा

Abhijeet Shinde

धनुष्यबाण आमचाच! उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं

Abhijeet Shinde

Kolhapur; आर्थिक सत्ताकेंद्रासाठी गुरुजी निवडणूक आखाड्यात

Abhijeet Khandekar

पाकमध्ये 60 हिंदूंचे जबरदस्ती धर्मांतर

datta jadhav

अपहरणाच्या प्रयत्नात असलेल्या दोघा इसमांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका

Abhijeet Shinde

जगात सर्वाधिक आव्हाने भारतीय सैन्यासमोर

Amit Kulkarni
error: Content is protected !!