Tarun Bharat

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यु

शाहुवाडी प्रतिनिधी

मलकापूर कोकरूड   मार्गावर  पेरीड गावच्या हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आर्यन महेश उरुणकर वय पाच वर्षे हे बालक मृत झाले तर माधवी  महेश उरूणकर वय सत्तावीस रा जावडेकर चौक इस्लामपूर ता वाळवा व   राज गणेश पवार वय 15  हे  जखमी झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माधवी उरुणकर या आपले नातेवाईक व मुलगा आर्यन  समवेत येळवण जुगाईला दुचाकीवरून देव दर्शनासाठी निघाल्या होत्या पेरीड गावच्या हद्दीत त्यांची मोटरसायकल घसरली यात गाडीवर बसलेला आर्यन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तातडीने त्याला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान गंभीर जखमी असलेल्या माधवी उरूणकर व राज पवार यांना तातडीने पुढील उपचारासाठी  कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. मृत आर्यनचे मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा प्राथमिक तपास महिला पोलीस बी बी यादव या करत आहेत

चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
या अपघातात पाच वर्षाचा आर्यन हा मृत झाल्याने त्याच्या नातेवाईकांसह परिसरातून हळहळ व्यक्त होत होती सकाळी हसत चेहऱ्याने आलेल्या आर्यांनला मृत्यूने कवटाळले याने या घटनेबद्दल सर्वत्रच दुःख व्यक्त केलं जात होतं

Related Stories

`टीपी’ भरणार महापालिकेची तिजोरी

Archana Banage

गुजरात टायटन vs दिल्ली कॅपिटल सामन्यावर सट्टा, 27 लाखांच्या रोकडसह तिघांना अटक

datta jadhav

टिंबर मार्केट परिसरात बेकायदा वृक्षतोड

Abhijeet Khandekar

आरे येथे महापुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी आढावा बैठक

Archana Banage

देशद्रोही जैन यांचे किती काळ संरक्षण करणार ? : स्मृती इराणी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : डॉ. अर्चना यांनी शोधले दर्जेदार बी-बियाणे

Archana Banage