Tarun Bharat

शाहूवाडी येळाणे येथे चोरी; ३ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Advertisements

 शाहूवाडी/प्रतिनिधी

  येळाणे तालुका शाहूवाडी येथील राजश्री भास्कर पाटील याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून, मोडून अज्ञात चोरट्याने सुमारे तीन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.दरम्यान श्वान पथक व फिंगर प्रिंट तंज्ञाना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोनि विजय पाटील यांनी दिली.

पोलिसातून व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, येळाणे येथील राजश्री पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दि.९ जून रोजी सायंकाळी ७.४५ वा.ते १० जून सकाळी ७.३०  घ्या दरम्यान दरवाज्याचे सेंट्रल लाॅक कोणत्या तरी हत्याराने उचकटून घरातील सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या रिंगा,  सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या कानातील कुड्या व साखळी-प्रत्येकी दोन नग, सोन्याची लहाण मुलाच्या कानातील बाली व ठुशी-प्रत्येकी एक नग असा तीन लाख दहा हजार रूपये चां मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.

दरम्यान याच परिसरात भाड्याने राहणाऱ्या व सुट्टी निमित्त गावी असणा-या शिक्षकांच्या खोल्यांचे दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी अंथरूण, कपडे व संसारोपयोगी वस्तू अस्ताव्यस्त चाकल्या होत्या. दरम्यान शाहूवाडी पोलिसांनी श्वान पथक व ठसे तंज्ञा पाचारण केले होते. श्वान पथक परिसरातच घुटमळले. अधिक तपास फौ.प्रशांत कोळपे करीत आहेत.

Related Stories

तरुणीची छेड काढल्याच्या समजूतीतून तरुणावर प्राणघातक हल्ला

Abhijeet Shinde

काटा मारणाऱ्यांचा काटा काढाच !

Abhijeet Shinde

‘त्या ‘ रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल महत्त्वाचे ठरणार

Abhijeet Shinde

कोडोलीत विवाहितेवर सामूहिक अत्याचार, दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

२९०० मे.टन यूरिया वितरित, मग गेला कोठे ?

Abhijeet Shinde

गोकुळ दूध संघ व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीकडून दूध उत्‍पादक शेतकऱ्यास दिलासा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!