Tarun Bharat

Kolhapur; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकापक्ष स्वबळावर लढविणार : एकनाथराव पाटील

भोगावती / प्रतिनिधी

जिल्हा परिषद पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका राधानगरी तालुका शेका पक्षाच्या वतीने स्वबळावर पूर्ण ताकदीने लढविण्याचा आम्ही निर्धार केला आहे. यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे. असे आवाहन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक एकनाथ पाटील कंथेवाडीकर यांनी बुधवारी केले. राधानगरी तालुक्याच्या वतीने शेका पक्षाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भोगावती येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष अंबाजी पाटील होते.

अधिक वाचा- जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन प्रभाग रचना रद्द

पाटील पुढे म्हणाले घोडे बाजाराच्या राजकारणापासून दूर असणारा एकमेव पक्ष म्हणजे शेकापच आहे. एकनिष्ठपणा हा सर्वांनी शेकापक्षाकडून शिकला पाहिजे.अशा चांगल्या कार्याची शिदोरी घेऊनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.

प्रारंभी ध्वज पूजन पांडुरंग कुडित्रेकर यांच्या हस्ते झाले. तर ध्वजारोहन उमाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भोगावतीचे माजी संचालक संजय डकरे, शिवाजी सावंत, अमृत पाटील, विष्णुपत एकशिंगे, आनंदराव पाटील, कृष्णात आंबेकर, मोहन पाटील, शिवाजी वाघुर्डेकर, बाळू पोवार, मधुकर पाटील, विश्वास परीट, विलास डवरी, दौलत कांबळे, भगवान पाटील, आनंदा पाटील यांच्यासह राधानगरी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुधाकर चव्हाण यांनी आभार मानले.

Related Stories

आकनूर – मांगेवाडी रस्त्याचे लाखो रुपये मातीत

Archana Banage

भाजपकडून सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कोरोना नसेल तरच जिल्ह्यात प्रवेशाचा आदेश रद्द : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Archana Banage

आईकडे जाता येत नसल्याच्या नैराश्यातून युवतीची आत्महत्या

Archana Banage

चारचाकी पलटी होऊन सहाजण जखमी; दोघे गंभीर

Abhijeet Khandekar

मुल होत नसल्याने सासरच्या त्रासाला कंटाळून महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या

Archana Banage