शिरोळ प्रतिनिधी
येथील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मेस्त्री घराण्यात विधवा वहिनीशी सख्या दिराने विवाह करून शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत पुरोगामी विचार रुजविण्याचा एक नवा इतिहास घडविण्याचा प्रयत्न मेस्त्री घराण्याने केला. याकामी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यात त्यांना यशही आले.
येथील येथे श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक कै. इसुफ साहेब मेस्त्री यांचे नातू दत्त कारखान्याचे संचालक कै अंजुम मेस्त्री यांचे दोन वर्षापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. निधनावेळी त्यांना तीन महिन्याचे बाळ होते. त्यांची पत्नी सानिया यांना मेस्त्री परिवारातील सदस्यांनी आपुलकीने सांभाळ करीत आहेत. ऐन तारुण्यामध्ये अंजुम यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी सानिया व लहान बाळाचे कसे होणार या विवंचनेत असतानाच अंजुमनचे लहान भाऊ मंजूर याने आपली विधवा भावजय श्रीमती सानिया त्यांच्याशी विवाह करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या कामी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन मुलाचे वडील रहीम मेस्त्री, आई जहअरा मेस्त्री, मुलीचे वडील मौला मेहबूब शेख, मुलीची आई आयेशा मौला शेख यांच्याशी सल्लामसलत केली. विवाहास संमती दिल्यावर आज सायंकाळी सहा वाजता मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यात शुभ आशीर्वाद देण्यासाठी भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, फतेलाल मेस्त्री, परवेश मेस्त्री, मुसा डांगे, मेस्त्री परिवारातील सर्व सदस्य होते.