Tarun Bharat

धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा; महापुरुषाचा अवमान केल्याने शिवसेना आक्रमक

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापुरातील तरुण मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सच्या ठिकाणी काही तृतीयपंथीय महिला आणि इतर सिगारेट सुद्धा उघडपणे ओढत असताना दिसून येत आहे. असं असताना कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस काय करत होते, असा सवाल कोल्हापुरातील शिवसैनिकांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव आणि उघडपणे धूम्रपान आणि त्याचबरोबर गांजाचा वापर झाला आहे, त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केलीय. ही मागणी करत असताना तालीम मंडळाला दोषी न धरता ज्यांनी ही कृती केलीय त्याच्यावरच गुन्हा दाखल करावा अस शिवसैनिकांनी म्हटलंय.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती घेऊन संबधितावर गुन्हा नोंद करणार असल्याचे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले.

Related Stories

मनपाला चार दिवसांचे अल्टीमेटम, अन्यथा सोमवारी वर्कशॉपला टाळे

Kalyani Amanagi

कोल्हापूर : गगनबावडा महावितरण कंत्राटी वायरमनचा सर्प दंशाने मृत्यू

Abhijeet Shinde

पैलवान पृथ्वीराज पाटीलने कुस्तीपंढरी कोल्हापूरची उंचावली शान

Abhijeet Shinde

आजऱ्याची लेक जयश्री जाधव यांच्या विजयानंतर आजऱ्यात जल्लोष

Abhijeet Shinde

उचगावात २४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना रद्द, दूधगंगेतून पाणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!