ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर: महाराष्ट्रात शिवसेनी की ठाकरे सेना यावरुन वातावरण तापलं असतानाचं आज कोल्हापुरात पुन्हा शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलिसांचा आदेश धुडकाऊन आक्रमक शिवसैनिकांनी बंडखोर आमदार प्रकाश अबीटकर यांच्या घरावर हल्लाबोल केला आहे. पोलिसांनी मार्चा काढण्यास परवानगी नाकारली होती. मात्र तरीही शिवसैनिकांनी मोर्चा काढल्याने कोल्हापुरात काही काळ वातावरण तंग राहिले होते.
महाराष्ट्रात ज्या-ज्यावेळी अन्याय होईल त्या-त्यावेळी शिवसेना तोड-फोड-मोड केल्याशिवाय राहणार नाही. जरी आम्हाला परवानगी नाकारली असली तरी पोलिसांचे कडे तोडून आबिटकरांच्या घरात घुसू असा इशारा ग्रामीण जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. आज सकाळी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह शिवसैनिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे शिवसैनिक आणखी आक्रमक झाला आहे.
LIVE पाहण्यासाठी येथे क्लिक करा: शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा
जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, बंडखोर आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. तुमचा त्रास मी समजू शकतो असेही ते म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटुंबाने देखील आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून सांगितले मग तुम्हाला काय अडचण आहे. कोणाच्या दबावाखाली तुम्ही तिथे राहिला आहात. तुमच्या डोक्यावर कोणी बंदुक लावली आहे का?कोणत्या बॅगा तुम्हाला दिल्या आहेत अशी शंका आम्हाला येत आहे. मला खात्री आहे त्यातील निम्मे आमदार ‘फ्लोर टेस्ट’ झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत जातील. अन्यथा पुढील निवडणूकीत तुम्ही राजीनामे द्या अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे.
तर एकीकडे शिंदे गट हा आज खाजगी विमानाने गोव्याला जाणार आहे. गोव्यात ‘ताज कन्वेंशन’ मध्ये 71 खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदेसह 51 आमदार हे गोव्यामध्ये ताज कन्वेंशन या हॉटेलमध्ये थांबतील आणि उद्या सकाळी मुंबईला पोहचतील अशी माहिती समोर आली आहे.