त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्दचा परिणाम; कोल्हापूर महापालिका निवडणूकीच; ‘खेळखंडोबा’ सुरूच; इच्छुकांमध्ये घालमेल; राज्यकर्त्यांच्या राजकारणाचा मनपा यंत्रणाला फटका
विनोद सावंत कोल्हापूर
शिंदे सरकारने महाविकास आघाडीचा त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द केली असून चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेला पुन्हा निवडणूकीची श्रीगणेशा करावी लागणार आहे निवडणूकीबाबत सतत धोरणात बदल होत असल्याने निवडणूकीचा खेळखंडोबा आणखी किती दिवस सुरू राहणार असा संतप्त सवाल इच्छुकांतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2022 रोजी संपली आहे. दोन वर्ष होत आली तरी नवीन सभागृह अस्तित्वात आलेले नाही. कोरोना, ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत सतत बदलणारे राज्य शासनाचे धोरण यामुळे चार ते पाच वेळ निवडणूक लांबणीवर पडली. तसेच महापालिका प्रशासनाला नव्याने प्रक्रिया करावी लागली. परिणामी निवडणूकीच कामकाज प्रशासनाचे डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक डय़ूटी नको, अशीच त्यांची भूमीका आहे. इच्छुकांमध्येही घालमेल होता आहे.
महाविकास आघाडीला दणका
महाविकास आघाडीने भाजप सरकारचा चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करत त्रिसदस्यीयचा निर्णय घेतला. आता पुन्हा भाजप सत्तेत आहे. महाविकास आघाडी सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचना स्वतःचे उमेदवारांच्या फायदा होईल, अशी केली असल्याची तक्रार भाजप नेत्यांनी हायकंमाडकडे केली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करून महाविकास आघाडीला आणखीन एक धक्का दिला.
सर्वसामान्यांना दणका, तगडय़ा उमेदवारांची चलती
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे सर्वसामान्य आणि अपक्ष उमेदवारांचे कंबारडे मोडले होते. आता तर चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय होत आहे. कायद्याच्या कचटय़ात हा निर्णय अडकला नाही. यानुसार अंमलबजावणी झाली तर सर्वसामान्यांना दणका बसणार असून तगडय़ा उमेदवारांचीच चलती राहणार आहे. याचबरोबर पक्षीय पातळीवरच निवडणूक होणार आहे.
खेळखंडोबा केव्हा संपणार
महापालिका निवडणूकीची प्रक्रिया गेले दोन वर्ष सुरू आहे. सतत निवडणूकीची धोरण बदलत आहे. कधी एक सदस्य, कधी त्रिसदस्यीय तर कधी चार सदस्यीय असा निर्णय झाला. याचबरोबर ओबीसी शिवाय तर ओबीसीसह आरक्षण सोडतही काढावी लागली. यामध्ये महापालिका प्रशासनातील अधिकाऱयांचे दमछाक होत आहे. इच्छुकांमध्येही घालमेल सुरू आहे. त्यामुळे शासनाकडून सुरू असणारा खेळखंडोबा नक्की केव्हा थांबणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आता पर्यंतची निवडणूकीचा प्रवास
-एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार 81 नगरसेवकाने प्रारूप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना, प्रारूप मतदार यादी, अंतिम मतदार यादीचे काम
-एक सदस्यीय प्रभाग रचना रद्द त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय
-ओबीसीसाठी निवडणूक प्रक्रियेला काही दिवस ब्रेक
-त्रिसदस्यीय प्रभाग रचना आणि 92 नगरसेवकानुसार प्रारूप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना, प्रारूप मतदार यादी, अंतिम मतदार यादी, ओबीसी शिवाय आरक्षण सोडत, ओबीसीसह आरक्षण सोडत