कसबा बावडा / प्रतिनिधी
दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया ज्युनिअर मुली हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडिया मार्फत कोल्हापूरच्या राष्ट्रीय ज्युनिअर पंच पदासाठी सिद्धी जाधव हिची निवड करण्यात आली. ही स्पर्धा नवी दिल्ली येथे दि. १६ ते २३ ऑगस्ट या कालावधीसाठी होणार आहे.
सिद्धी ही डॉ.विजयसिंह यादव महाविद्यालय (पेठ वडगाव) व देवगिरी फायटर्सची खेळाडू असून राष्ट्रीय सब जुनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी ग्वालियर व अमरावती येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर मुली व अखिल भारतीय महिला हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले असून सिद्धीला हॉकी महाराष्ट्राचे सेक्रेटरी मनोज भोरे, सर्व पदाधिकारी व सदस्य, क्रीडाशिक्षक संताजी भोसले, प्रशिक्षक राहूल गावडे, दिग्विजय नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.