Tarun Bharat

‘वंचित’चे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

भोजनदान, संविधान प्रेम भेट

कोल्हापूर प्रतिनिधी

वंचित बहुजन नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सरकारी कार्यालयात संविधान फ्रेम भेट देण्यासह भोजनदान करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडी, कोल्हापूर शहर व करवीर तालुकाच्या वतीने भोजनदान करण्यात आले.सी.पी.आर. चौक येथील कोल्हापूर थाळी या ठिकाणी नागरिकांना भोजनाचा लाभ देण्यात आला.

तसेच कोल्हापूर महानगरपालिका, सावित्रीबाई फुले रुग्णालय या ठिकाणी संविधान प्रेम रुग्णालयाला भेट देण्यात आली. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या प्रभारी प्रमुख मंजुश्री रोहिदास यांच्याकडे संविधान पेम सुपूर्द करून मुख्य प्रवेशद्वारात प्रेम लावण्यात आली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, कृष्णात कांबळे, शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, जिल्हा नेते अमित नागटिळे, दशरथ दीक्षांत, आकाश कांबळे, सचिन कांबळे, आकाश कांबळे, सिध्दार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

सातारा : वीज कनेक्शन न देताच शेतकऱ्याला आले वीजबिल

Archana Banage

प्रा. जयंत आसगावकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ातील बाजार समित्या आज राहणार बंद

Archana Banage

शिवसेना सहाव्या जागेसाठी आज दुसरा उमेदवार जाहीर करणार?

datta jadhav

कोल्हापूर : ‘दक्षिण’ मध्ये रविवारी ५ हजार झाडे लावणार

Archana Banage

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage