Tarun Bharat

खा.धनंजय महाडिक यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल

चिरंजीव विश्वजित महाडिक यांचाही अर्ज दाखल; वाहनांची संख्या मोठी असल्याने भैय्या चौकात वाहतुकीची झाली होती कोंडी

Advertisements

प्रतिनिधी/ सोलापूर

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपल्या समर्थकांसह पुळूज मतदारसंघातून सोमवार, दि. 27 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान खासदार महाडिक हे सकाळी अकराच्या सुमारास आपल्या शेकडो समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी येत असताना भैय्या चौकात तब्बल 101 गाडय़ांचा ताफा आल्यामुळे वाहनांची मोठय़ा प्रमाणात कोंडी झाली होती.

दरम्यान, धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वजित महाडिक यांनीसुद्धा सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दोघांचे अर्ज स्वीकारले. यावेळी संजय क्षीरसागर, बिभीषण वाघ, भैय्या महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विनोद महाडिक, पवन महाडिक, सुनील चव्हाण, सतीश जगताप, लक्ष्मण गुरव, अंकुश अवताडे, शिवाजी गुंड यांच्यासह मोठय़ा प्रमाणात समर्थक उपस्थित होते.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
मी स्वतः धनंजय महाडिक आणि माझा चिरंजीव विश्वजित महाडिक असे दोन अर्ज आज दाखल केले. 30 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे आणि ही सगळी प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही आमच्या गटाचे अर्ज भरत आहोत. या निवडणुकीमध्ये आता सहकारी साखर कारखाना निवडणूक होत असताना आम्हाला पारंपरिक विरोधक आहेत. त्याच्यामध्ये पंढरपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांना आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना मी विनंती केली की शेतकऱयांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे. आम्ही अपेक्षा करतो की, त्यांनी यामध्ये आम्हाला सहकार्य करावे. धनंजय महाडिक, खासदार

Related Stories

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

निर्यात वाढविल्यामुळे देशात लसींचा तुटवडा

Patil_p

…मी कधी पाठीमध्ये खंजीर खुपसला नाही : एकनाथ खडसे

Rohan_P

लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित

datta jadhav

गुजरातमधील राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

SSC Result 2021: दहावीचा उद्या ऑनलाईन निकाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!