Tarun Bharat

परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालक सुसंवाद गरजेचा…

तरूण भारत : प्रतिनिधी

दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे हा कळल्यावर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मानसिक तणावातून जावे लागते. ज्यांना निकाल अपेक्षित असतात त्यांना तर एका खुप कठिण स्थितीमधून जावे लागते. अशावेळी पाल्यासह पालकांना ही समुपदेशनातची गरज असते. निकाल कसा ही लागो पालकांनी आपल्या कुटुंबासह स्वत: आपल्या पाल्याशी कशा प्रकारे वर्तन करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊयात.

दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद साधणे महत्वाचे आहे. आपल्या पाल्याना विश्वासात घेऊन त्यांना गोष्टी समजुन सांगणे गरजेचे आहे. या वयात मुले खूपच संवेदनशील असतात, असा वेळी त्यांना मानसिक आधाराची गरज असते. पालक या नात्याने त्यांचे मनोबल वाढवणे महत्वाचे आहे. निकालाच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

1. लागणाऱ्या निकालाची कोणतीही वाढीव अपेक्षा न ठेवता ती स्विकारण्याची तयारी ठेवली पाहीजे. निकाल अपेक्षित असो किंवा अनपेक्षित त्यामुळे आपल्यासह पाल्यांचे मानसिक संतूलन ढळू देऊ नका.

2. अनपेक्षित निकाल आल्यास किंवा नापास झाल्यावर आपल्या पाल्यावर रागावू नका. त्यांची समजूत घाला. त्याला धीर देऊन त्याची काळजी घ्या.

3. आपल्या पाल्य़ाची तुलना इतरां मुलांसोबत करू नका. अशी तुलना केल्याने मुलांमध्ये न्युनगंड निर्माण होऊ शकतो. या किशोरवयात निर्माण झालेला न्युनगंड त्याचा आयुष्यभर पाठलाग करू शकतो.

4. आजकालची पिढी ही डिजीटल युगात जगणारी आहे. त्यामुळे त्यांना य़श अपय़शाचे धक्के सहजासहजी पचवू शकत नाहीत. त्यामळे अपयशाला कसे सामोरे गेले पाहीजे हे त्यांना शिकवून त्यांना सक्षम करण्याकडे आपली प्रथमिकता असली पाहीजे.

5. निकाल सकारात्मक लागला असल्यास आनंद साजरा करताना नापास विद्यार्थ्यांच्या भावनांना ठेच पोहचेल असे वर्तन असू नये. कोणात्याही नापास विद्यार्थ्याची चेष्टा न करता त्याला धीर द्या.

6. आपल्या पाल्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या यशाच्या गोष्टी सांगून त्याला प्रेरणा द्या. केवळ मार्क्स म्हणजे गुणवत्ता नसून कौशल्य हीच गुणवत्ता कशी ठरू शकते हे पटवून द्या.

7. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम याच्या जिवावर आपण आपयशाला कशा प्रकारे याशामध्ये रूपांतरीत करू शकतो हे पटवून द्या.

Related Stories

गुजरातमधील ‘या’ शहरात 21 मे पर्यंत कर्फ्यू

Tousif Mujawar

एकनाथ शिंदेंना २०१४ ला युती तोडायची होती, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Archana Banage

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे 8 बंडखोर आमदार सपामध्ये दाखल

datta jadhav

Kolhapur; महे- कसबा बीड पुलावर पाणी; वाहतूक बंद

Abhijeet Khandekar

जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड, हीच खरी श्रद्धांजली

Abhijeet Khandekar

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच सतेज पाटलाचं मोठं वक्तव्य, वाचा काय म्हणाले

Abhijeet Khandekar