Tarun Bharat

शालेय दिव्यांग खेळाडूंना मिळणार सानुग्रह अनुदान

जि.प.समाजकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय : आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्यपातळीवरील दिव्यांग खेळाडूंना मिळणार अनुदान : पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 75, 50, व 25 हजारांचे अनुदान : पॅराआलिंपिक, पॅराएशियन खेळाडूंचे अनुदान बंद

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या 5 टक्के स्वनिधीतून समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग खेळाडूंना सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत सन 2017 पासून पॅराआलिंपिक, पॅराएशियन, पॅराकॉमनवेल्थ या खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यपातळीवर पातळीवर सहभागी होऊन प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग खेळाडूंना (वयाची अट नाही) सानुग्रह अनुदान दिले जात होते. यामध्ये दरवर्षी ठराविक खेळाडूंनाच सानुग्रह अनुदानाचा लाभ होत होता. त्यामुळे या खेळाडूंना दिले जाणारे अनुदान बंद करून यापुढे शालेय आणि महाविद्यालयीन दिव्यांग खेळाडूंना पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे 75, 50 आणि 25 हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय समाजकल्याण समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीची बैठक झाली. या बैठकीत दिव्यांग खेळाडूंना देण्यात येणाऱया अनुदानाबाबत महत्वाचा निर्णय सीईओ चव्हाण यांनी घेतला. यापूर्वी पॅराऑलिंपिकसह अन्य खेळ प्रकारात प्राविण्य मिळवणाऱया खेळाडूंचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त होत होते. यामध्ये अपवाद वगळता दरवर्षी ठराविक दिव्यांग खेळाडूंनाच अनुदानाचा लाभ होत होता.

यावरून अनेकदा जि.प.समाजकल्याण विभागात वादावादीचेही प्रसंग उद्भवले होते. पण या अनुदानाचा लाभ शाळकरी आणि महाविद्यालयीन पातळीवर शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना मिळत नव्हता. या सर्व परिस्थितीचा विचार करून सीईओ चव्हाण यांनी शिक्षण घेणाऱया दिव्यांग खेळाडूंना अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
बैठकीमध्ये समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱया सर्व योजनांचा तपासणी अहवाल त्वरित सादर करण्याबाबत सीईओ चव्हाण यांनी तालुक्याच्या अधिकाऱयांना सूचना दिली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वैश्विक ओळखपत्रांचे वाटप
कोल्हापूर जिह्यातील दिव्यांगांना देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र वाटपाबाबत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या सेवा पंधरवडय़ाच्या निमित्ताने वैश्विक ओळखपत्र वाटपाची विशेष मोहिम राबविण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर जि.प.चे सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्राचे वाटप करून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी कोल्हापूर जिह्यात प्राप्त झालेले 3 हजार 814 वैश्विक ओळखपत्र दिव्यांगांना प्रत्यक्ष घरी जाऊन देण्याबाबत सूचित केले.
स्मृती भ्रंश दिन साजरा
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत 21 सप्टेंबर हा जागतिक स्मृती भ्रंश दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी. रणवीर यांनी स्मृती भ्रंश आजाराची लक्षणे उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱया शिंगणापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर व सूर्यप्रभा चिटणीस यांचा सीईओ चव्हाण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Related Stories

पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

Archana Banage

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड

Archana Banage

कोल्हापूर : रब्बीच्या पेरण्या दबकतच…

Archana Banage

कोरोनाच्या काळात तुळशीची बाजारपेठ विस्तारली

Archana Banage

कोल्हापूर : हुपरीत गुटखा विक्रेत्यावर कारवाई; एकास अटक

Archana Banage

कोल्हापूर : ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या -पालकमंत्री

Archana Banage