Tarun Bharat

KK; रंकाळा महोत्सवात के.के.च्या जादूई आवाजाची मोहिनी !

करवीर नगरतील 1 मार्च 2009 च्या दिवसाची आठवण ताजी; आपल्या गाण्यांनी कोल्हापूरकर रसिकचाहत्यांना केले होते मदहोश

संजीव खाडे कोल्हापूर

1 मार्च 2009 रोजीची संध्याकाळ…. कोल्हापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या रंकाळा महोत्सवात सुप्रसिद्ध पार्श्वगायक के.के. अर्थात कृष्णकुमार कुन्नथच्या गाण्याचा कार्यक्रम झाला होता. रंकाळा चौपाटीच्या पदपथ उद्यानातील स्टेजवर के. के. ने केलेला परफॉर्मन्स अविस्मरणीय होता. त्याने उपस्थित हजारो कोल्हापूरकारांना आपल्या जादूई आवाजाच्या ताकदीवर अक्षरशः भान विसरून थिरकायला लावले. बुधवारी के. के. चे अकस्मिक निधन झाले. त्याचे चाहते असणाऱया कोल्हापूरकरांसाठीही देशवासीयांप्रमाणे धक्का होता. के. के.ने गायलेल्या गाण्याच्या आणि त्याच्या करवीर नगरीतील दोन तीन दिवसांच्या वास्तव्याच्या आठवणी ताज्या झाल्या.
2009 च्या रंकाळा महोत्सवात अनेक दिग्गजांनी कला पेश केली. त्यामध्ये के. के. देखील होता. 1 मार्च 2009 या दिवशी रंकाळा पदपथ उद्यानातील स्टेजवर आँखो मे तेरी….अजबसी…., खुदा जाने, प्यार के पल, अजनबी… अजनबी, तडप तडप के ही लोकप्रिय गाणी के.के.ने आपल्या जादूई आवाजात गात उपस्थितांना थिरकायला लावले. के.के.चा जलवा त्यावेळी कोल्हापूरकर रसिकांनी अनुभवला. त्याच्या निधनाने या साऱया आठवणींना उजाळा मिळाला. आता पुन्हा के.के.चा परफॉमन्स पाहायला मिळणार नाही, अशी भावनाही चाहत्यांनी व्यक्त केली.
तांबडा पांढऱया ताव अन् मटणाच्या लोणच्याची चव
2009 च्या रंकाळात महोत्सवात कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागातील सध्याचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्यावर के. के. याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. के. के. रायसन हॉटेलवर (आताचे सिस्ट्रस हॉटेल) उतरला होता. त्याने कोल्हापुरी मटण, तांबडा पांढरा रस्स्याचा आस्वाद घेतला. कोल्हापुरी मटणाचे लोणचे तो ऐकून होता. त्याला उत्सुकता होती. मस्कर यांना त्याने मटणाचे लोणचे मिळेल काय? असे विचारले. मस्कर यांनी तातडीने यंत्रणा राबवित त्याला इंगळे यांच्या पद्मा हॉटेलमधून मटणाचे लोणचे आणून दिले. ते खाल्ल्यानंतर के.के. खूष झाला होता. त्याने कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीचेही कौतुक केले हेते.
कोल्हापूर के लोग बहुत अच्छे है…….
रंकाळा महोत्सवात गाणी सादर केल्यानंतर कोल्हापूरकारांनी के.के.ला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्यानंतर कार्यक्रम संपवून मुंबईला जाताना के.के.ने कोल्हापूर के लोग बहुत अच्छे है, बिनधास्त है, दिल से रिस्पॉन्ड करते है, अशा शब्दात कौतुक केल्याची आठवण रमेश मस्कर यांनी सांगितली.

आयुक्त विजय सिंघल यांनाही मोह आवरला नाही
2009 मध्ये कोल्हापूर महापालिकेचे महापौर सागर चव्हाण होते. आयुक्तपदी विजय सिंघल तर उपायुक्तपदी गणेश देशमुख होते. रंकाळा महोत्सवातील के.के. परफॉमन्स पाहण्यासाठी सिंघलही उपस्थित होते. के. के. च्या गाण्याच्या ठेक्यावर सिंघल यांनाही नृत्य करण्याचा मोह आवरला नव्हता.

Related Stories

Kokan Crime : गुहागर चिखली मांडवकरवाडीत 48 वर्षीय इसमाचा खून

Abhijeet Khandekar

कुंभोज आठवडी बाजारात महिलेचे दागिने लांबवले; पोलिसांचे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar

CRIME:MURDER:कोल्हापूर साळोखेनगरात तरुणाचा भोसकून खून

Rahul Gadkar

कोल्हापूर : केंद्र सरकारवर दबाव वाढवा

Archana Banage

जिल्हय़ात आज कोविड-19 महा लसिकरण मोहिम

Patil_p

बंगाल विधानसभेत जोरदार हाणामारी

Archana Banage