Tarun Bharat

Ratnagiri; कच्च्या आणि दर्जाहीन पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटपाने उडाला गोंधळ

रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेतील प्रकार; ठेकेदारी पद्धतीच्या आहार वाटप गोत्यात

रत्नागिरी प्रतिनिधी

शालेय पोषण आहार शालेय पोषण आहार पुरवठा करण्यासाठी ठेकेदार पद्धतीची अमलबजावणी आज सोमवार 1 ऑगस्ट पासून सुरु झालीय. रत्नागिरी शहरातील शाळांना अशाप्रकारे पोषण आहार पुरवठा शाळांमध्ये सुरु झालेला आहे. त्यावेळी येथील शिर्के हायस्कुल मध्ये विद्यार्थांना पोषण आहार देत असतानाच गोंधळ उडाला.

कच्या आणि अर्धवट शिजलेल्या स्वरूपाचा आहार आणि दर्जाहीन अशा स्वरूपाचा आहार विद्यार्थांना वाटप करण्यात आला, त्यात डोक्यातील केसही आढळून आल्याची बाबा शिक्षकांच्या निदर्शनास आली. हि बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास येताच मुख्याध्यापकांनी लगेच न,प,चे अधिकारी सुनील पाटील यांच्या कानावर घालण्यात आली. पाटील यांनी लगेचच शाळेत धाव घेतली, घडल्या प्रकारची शहानिशा केली. तातडीने पोषण आहार बदलून देण्याच्या सुचना ठेकेदार ए. एस. सानप यांना देण्यात आल्या. दरम्यान वाटप केलेला आहार 80 टक्के विद्यार्थांनी न खाताच बाहेर फेकून दिला. हि बाब निदर्शनास येताच विद्यार्थी उपाशी राहू नयेत म्हणून लगेचच सिद्धिविनायक या संस्थेशी संपर्क साधून दर्जाहीन पोषण आहार बदल्यात चांगला पोषण आहार या शाळेत मागवून घेण्यात आला. त्या आहाराचे विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आणि हा निर्माण झालेला गोधळ मिटला. पण संबधित ठेकेदाराला न प शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सुनील पाटील यांनी कडक शब्दात सूचना देत, पोषण आहार दर्जा उत्तम ठेवण्यात यावा, त्यात सुधारणा न झाल्यास ठेका रद्द करण्याचा अहवाल देण्यात येईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Related Stories

रत्नागिरीतील नीरा साखर वाढवतेय

Patil_p

तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार

Patil_p

चिपळुणात लाल, निळी रेषा निर्बंध उठवणे अशक्य!

Patil_p

मंगलोर स्पेशल एक्सप्रेसचा अपघात टळला

Patil_p

अमेरिकेत राखी पाठवण्यासाठी लागणार १५५० रुपये

Patil_p

‘उमेद’ ला बांधू नका कंत्राटदारांच्या दावणीला

Patil_p