नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; पंचगंगा 27.6 फूटांवर; पुढील दोन दिवस जोर कायम राहणार
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पंचगंगेची पाणीपातळी 27.6 इंचावर पोहोचली आहे. राधानागरी धरणाचे तीन दरवाजे अद्याप खुले असल्यामुळे 5884 क्युसेक जलविसर्ग सुरु आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे 36 बंधारे पाण्याखाली आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 68.8 मि.मी पाऊस झाला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
जिल्हय़ात 36.5 मिमी पाऊस
हातकणंगले 13.7 मिमी.पाऊस झाला असून शिरोळ 15.2, पन्हाळा 31.4, शाहूवाडी 41.7, राधानगरी 46.8, गगनबावडा 68.8, करवीर- 37.8, कागल 32.8, गडहिंग्लज 21.6, भुदरगड- 58.9, आजरा 36.3, चंदगड 71.8 असा एकूण सरासरी 36.5 मिमी पाऊस झाला आहे.
36 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, राशिवडे व हळदी, तुळशी नदीवरील- बीड, कासारी नदीवरील- यवलूज व ठाणे आळवे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड व सुळकुड, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड व कुर्तनवाडी, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर भोगोली, कानडे सावर्डे व हिंडगांव, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील-निलजी, ऐनापूर, गिजवणे व साळगांव असे एकूण 36 बंधारे पाण्याखाली आहे.
धरणांतील पाणीसाठा (दलघमीमध्ये)
राधानगरी धरणांत 234.16 दलघमी पाणीसाठा असून, तुळशी 97.41 r,वारणा 945.98, दूधगंगा 631.12, कासारी 76.99, कडवी 69.93, कुंभी 75.75, चिकोत्रा 43.12, चित्री 53.41, घटप्रभा 44.17, आंबेआहोळ 30.98, कुंभी, पाटगाव, जंगमहट्टी, जांबरे, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.