Tarun Bharat

कुंभोज येथे दोन ठिकाणी चोरी

Advertisements

कुंभोज/वार्ताहर

कुंभोज तालुका हातकणंगले येथे मसुदी कट्टा,जैन बस्ती परिसरात असणाऱ्या कुंतीनाथ चौगुले यांच्या गोकुळ दूध संकलन केंद्रामध्ये अज्ञात चोरट्याने रात्री दूधडेरी मध्ये कोणी नसल्याची पाहून, दाराचा कडी कोयडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सदर तिजोरी फोडून त्यामध्ये असणारी काही रोख रक्कम पसारा केली आहे. तिजोरीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून दिलेआहे. तसेच कुंभेश्वर मंदिर शेजारी राहणाऱ्या अमित नकाते यांच्या राहत्या घरी घरात कोणी नसल्याची पाहून अज्ञात चोरट्याने रात्री घराची दरवाजा उघडून घरामध्ये असलेल्या तिजोरीतील काही ग्रॅम सोने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे. सदर घटनेची नोंद हातकंणगले पोलिसात देण्यात आली आहे.

दरम्यान, पहाटेच्या सुमारास काही नागरिकांनी बस्तीसाठी जात असताना सदर दूधडेरीचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी कुतीनाथ चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता सदर दुध डेअरिमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. सदर चोरीच्या घटनास्थळी महात्मा गांधी तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष अजित गोपडगे, गाव कामगार पोलीस पाटील मोहम्मद पठाण परिसरातील नागरिकांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

याबाबत तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अजित गोपुडगे यांनी हातकणगले पोलिसात माहिती दिली आहे. परिणामी भर वस्तीत झालेल्या चोरीमुळे सदर परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले असून गेल्या काही दिवसांपूर्वी याच गल्लीत डॉक्टर अभिजीत कोरे यांच्या घरी लाखाची चोरी झाली होती. व आज पुन्हा त्याच गल्लीत चोरी झाल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून सदर वारंवार होण्या चोरीचा तपास पोलीस यंत्रणेने लावावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

कुंभेश्वर देवालय जवळ चोरी
कुंभेश्वर मंदिर परिसरात अमित नकाते त्यांचे घर असून सदर घरामध्ये काल वास्तवास कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून घरात असणाऱ्या तिजोरीची दार उचकटून तिजोरीत असणारे काही ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. भर वस्तीत असणाऱ्या घरांमध्ये झालेल्या चोरीमुळे नागरिकात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून सध्या वाडीभाग परिसरात एक आठवड्यात होणारी ही तिसरी चोरी आहे.

परिणामी सदर चोरीचा प्रकार पाहिला असता सदर चोऱ्या घरात कोणी नसलेल्या ठिकाणी झाल्या असून एकाच परिसरात होणाऱ्या वारंवार चोरीमुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. सदर चोरीच्या घटनास्थळाची माहिती तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष अजित गोपुडगे यांना अमित नकाते यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अजित गोपुडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची माहिती हातकलंगले पोलिसांना दिली आहे.

Related Stories

रेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात मतदान केंद्रांची माहिती होतेय अपलोड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कुंभोज ग्रामपंचायत इमारतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जागा द्यावी – वारणा दूध संघ संचालक अरुण पाटील

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप

Abhijeet Shinde

कोवाडला अभय पतसंस्थेत चोरी; तब्बल 75 तोळे सोन्यावर डल्ला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : देशाची आर्थिक घडी सावरण्याची संधी अर्थमंत्र्यांनी गमावली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!