Tarun Bharat

कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस फुल्ल

बेळगाव रेल्वेस्थानक गजबजले : प्रवाशांचा मिळतोय उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी /बेळगाव

दिवाळीनंतर पर्यटनाच्या हंगामाला सुरुवात होते. यामध्ये सध्या तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज शेकडो प्रवासी बेळगाव-तिरुपती व तिरुपती-बेळगाव असा प्रवास करीत आहेत.

तिरुपती बालाजीचे अनेक भाविक बेळगाव परिसरात आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ पर्यटनाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांसाठी रेल्वेचे बुकिंग आगाऊ करण्यात आले आहे. अत्यंत माफक दरात रेल्वेने तिरुपतीला पोहोचता येत असल्यामुळे केवळ बेळगावच नव्हे तर शेजारील चंदगड, सावंतवाडी या भागातूनही भाविक प्रवास करीत असतात. स्लीपर कोचसाठी 390 रुपये, एसी थ्री टायरसाठी 1 हजार 50, तर एसी टू टायरसाठी 1 हजार 505 रुपये तिकीट दर आकारणी रेल्वेकडून होत आहे.

कोल्हापूर ते तिरुपती अशा धावणाऱया या एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे दररोज एक्स्प्रेस बेळगावमधूनच फुल्ल होऊन तिरुपतीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. परतीच्या मार्गातही या एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु प्रवासाची तारीख निश्चित असेल तर महिनाभर पूर्वीच बुकिंग करणे गरजेचे बनले आहे. बेळगाव ते तिरुपती या मार्गावर परिवहन मंडळाची बससेवाही उपलब्ध असून, ऐरावत बसने 15 तासांत तिरुपतीला पोहोचता येते.

विमानसेवेलाही उत्तम प्रतिसाद

रेल्वेसोबतच बेळगाव-तिरुपती या विमानसेवेलाही उत्तम असा प्रतिसाद मिळू लागला आहे. अवघ्या 1 तास 5 मिनिटांत विमानाने तिरुपतीला भाविक पोहोचत आहेत. 3 हजार 105 रुपये या प्राथमिक तिकीट दरात विमानाने बेळगाव-तिरुपती असा प्रवास करता येतो. सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस विमानसेवा सुरू आहे. दुपारी 3.55 वा. बेळगावमधून निघालेले विमान सायंकाळी 5 वा. तिरुपतीला पोहोचते. तर परतीच्या प्रवासात सायंकाळी 5.25 वा. तिरुपतीहून निघालेले विमान 6.30 वा. बेळगावला पोहोचते.

विमानातून…

  • बेळगाव-दुपारी 3.45 वा. (निघते) – तिरुपती सकाळी 8 वा. (पोहोचते)
  • तिरुपती-रात्री 9.40 वा. (निघते)-बेळगावला सकाळी 11.25 वा. (पोहोचते)

Related Stories

विद्यार्थ्यांसाठी एसएसएलसीचा टप्पा भविष्यासाठी महत्वाचा

Patil_p

हिंदी प्रचार सभेतर्फे भारतीय भाषा दिवस साजरा

Patil_p

थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन

Omkar B

निपाणीत आज रामभक्तांचा मेळावा

Patil_p

मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे मिनी मॅरेथॉन

Rohit Salunke

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

mithun mane