टोप / वार्ताहर
टोप संभापुर येथील चिन्मय गणाधीश (गंधर्व ) परिसराच्या कपाउंडमधे गवा दिसल्याने घबराट पसरली आहे.
गेली अनेक महिन्यापासुन गव्याचे वास्तव्य कासारवाडी डोंगर व आसपासच्या परिसरात आहे. आज विनायक चतुर्थी आणि रविवार असल्याने चिन्मय गणाधीश व रिसॉर्टला गर्दी असते. गवा आज सकाळी या परिसरात आला असल्याची शक्यता आहे. चिन्मय गणाधीशसमोर असणार्या कपाउंडच्या आत गर्द हिरवी झाडी असून वनविभागाचे आधिकारी व पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
हा गवा मौजे तासगांव गावच्या दिशेने आला असल्याची प्राथमिक माहीती वन आधिकारी यांनी दिली. रेसक्यु टीम दाखल झाली आहे. नागरीकांनी गर्दी करु नये असे अवाहन वनपाल एस.एस.जाधव यांनी केले आहे.