प्रतिनिधी/कोल्हापूर
धारदार शस्त्र घेऊन राजारामपुरी परिसरात फिरणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलीसांनी अटक केली आहे. विपुल वसीम मलिक (वय 24 रा. मालती अपार्टमेंट, सम्राटनगर) आणि विनु उर्फ विनायक दत्तात्रय जाधव (वय 20 रा. राजारामपुरी 12 वी गल्ली, साई क्लिनिक शेजारी) अशी संशयितांची नांवे आहेत.
राजारामपुरी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी मंगळवारी माऊली चौक परिसरात विपुल मलिक आणि विनोद जाधव हे दोघेजण कुकरी सारखे धारदार शस्त्र घेऊन संशयितरीत्या फिरत होते. त्यांच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याच्या शक्यतेने मिळालेल्या माहितीवरुन पोलीसांनी त्या दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मलिक सापडला तर जाधव दुचाकीवरुन उडी मारुन पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करुन त्यांच्याकडील दुचाकी आणि कुकरी जप्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर तपास करत आहेत.
हे ही वाचा : गुजरातनजीक नौकेतून २०० कोटींचे हेरॉइन जप्त, सहा जण ताब्यात