चुये / प्रतिनिधी
सहा लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर- गारगोटी मार्गावर दिंडनेर्ली फाट्यावर कारवाई करण्यात आली.
बाजीराव श्रीपती यादव वय ३९ रा. सोनुर्ले ता. भुदरगड व ब्रम्हदेव शशिकांत पाटील वय 32 रा. किटवडे ता. आजरा हे दोघे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी दुपारी कोल्हापूर- गारगोटी मार्गावरती दिंडनेरली फाट्यावर येऊन थांबले होते. ही बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शितापीने या दोघांना बिबट्याच्या कातड्यासह अटक केली. या कातड्याची किंमत सहा लाख हून अधिक आहे. पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. संभाजी भोसले राजीव शिंदे खंडेराव कोळी बालाजी पाटील यांनी ही कारवाई केली.