15 मे रोजीच्या मंत्री आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत चर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना पक्ष आणखी बळकट करण्यासाठी जिह्यातील प्रत्येक गावात, आणि वॉर्डात शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतलेले जनहिताचे निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या बैठकीत संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱयांना कामाला लागण्याचा संदेश देऊन पक्षाचे काम न करणाऱया पदाधिकाऱयांना कानपिचक्या दिल्या.
सेनेचे जे पदाधिकारी निष्क्रीय आहेत, त्यांच्याबाबत लवकरच कठोर निर्णय घेतला जाईल, असा सज्जड दम दुधवडकर यांनी दिला. यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकाऱयांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार चंद्रदीप नरके, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील, विरेंद्र मंडलिक, अजित पाटील, बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, सुरेश पोवार, मंजित माने, बाजीराव कळंत्रे, राजू यादव, विनोद खोत, संदीप कारंडे, राजू सांगावकर, महिला जिल्हा संघटिका शुभांगी पोवार, स्मिता सावंत, सुजाता सुतार यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते.
ठाकरे व राऊत यांच्या दौऱयाचे नियोजन
शिवसंपर्क अभियानच्या (टप्पा 2) पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे 15 मे रोजी तर खासदार संजय राऊत 25 ते 28 मे दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत नियोजन करण्यात आले.