Tarun Bharat

दिवे घाटात, माउली थाटात.!

Advertisements

दत्ता जाधव : सासवड

टाळ-मृदंगाचा गजर…अंभगाचा नाद…अन् ऊन-सावलीची साथसंगत…अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा करत संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. शुक्रवारी सकाळी हा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंतःकरणानेच पुणेकरांनी पालखीला निरोप दिला. हडपसर येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले.

माउलींचा पालखी सोहळा टाळ-मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात दिवेघाटाच्या दिशेने निघाला. वडकी येथे पालखीने दुपारचा विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. दिवे घाट पाहताच वारकर्‍यांच्या अंगात बळ संचारले.  दुपारी चारच्या सुमारास वैष्णवांच्या मेळ्याने घाटात प्रवेश केला. माउलींचा पालखी रथ थाटात दिवेघाटातून मार्गक्रमण करू लागला. पालखीसवे वारकरीही धावू लागले. टाळ-मृदंगाचा, अभंगाचा निनाद डोंगरकपार्‍यात घुमला. अवघा दिवे घाट विठुनामाच्या गजरात दुमदुमून गेला.

 दिवेघाटाच्या परिसस्पर्शाने आत्मिक बळ प्राप्त झालेल्या वारकर्‍यांनी घाटाची ही अवघड चढण सहजगत्या पार केली. सायंकाळी पाचपर्यंत पालखी घाटमाथ्यावर पोहोचली. तर सायंकाळी माउलींची पालखी संत सोपान महाराजांच्या सासवडनगरीत विसावली. तेथे सासवडकरांनी पालखीचे अतिशय भक्तिभावात स्वागत केले.
     
 तुकोबांची पालखी ‘लोणी’त
 दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमार्गे लोणी काळभोर मुक्कामी दाखल झाली. लोणीत ग्रामस्थांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. तुकोबांच्या पादुका दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली.

Related Stories

कसबे डिग्रज ग्रामपंचायतीत ठेकेदारांची मक्तेदारी

Abhijeet Shinde

शिवसेनेला आणखी एक धक्का ! उदय सामंत हे शिंदेगटात सामिल

Abhijeet Khandekar

प्लास्टिक बंदी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत संशयास्पद वीस लाखाची रक्कम जप्त

Abhijeet Shinde

कौटुंबीक वादातून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

Abhijeet Shinde

सातारचा पारा पोहचला 40 अंशांवर

Patil_p
error: Content is protected !!