Tarun Bharat

Kolhapur; निम्म्या शहरात सोमवारी पाणीबाणी

मंगळवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा; ए, बी व ई वॉर्डचा समावेश

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

शिंगणापूर जल उपसा योजनेवरील मुख्य पाईप लाईनच्या गळती काढण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. या केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी, व ई वॉर्ड, सहीत उपनगरातील काही भागामध्ये सोमवारी (1) पाणी पुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरीकांनी पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणार परिसर

फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून असलेला संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराज नगर, वारे वसाहत, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर पंपींगवरील संपूर्ण भाग, वाय पी पोवारनगर, मिरजकर तिकटी तसेच ई वॉर्डातील संपूर्ण राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहुमिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंन्शन, पाचबंगला, कोरगावकर, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, मोहल्ला, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडीयल सोसायटी, तोरणानगर, काशिद कॉलनी, माने कॉलनी, चाणक्यनगर, एसटीकॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, गोळीबार मैदान, उलपे मळा, रमणमळा, केव्हीजपार्क, नागाळपार्क, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, महाडीक वसाहत, लिशा हॉटेल, मार्केटयार्ड, कावळानाका, स्टेशनरोड, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, शाहूपुरी व्यापारपेठ

Related Stories

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

राधानगरी पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक

Abhijeet Shinde

अकरावीची सीईटी 21 ऑगस्टला

Abhijeet Shinde

कोरोनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

Abhijeet Shinde

गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन द्या,अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde

शासकीय खर्चातून भाविकांना रिक्षा सेवा पुरविणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!