वारणानगर/ प्रतिनिधी
सातवे (ता. पन्हाळा) येथे घरी चालत जात असताना वृध्द माहिलेस समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटरसायकल स्वराने जोरदार धडक दिल्याने पार्वती शंकर पाटील ( वय ७० ) रा. सातवे ता.पन्हाळा ही वृद्ध महिला जागीच ठार झाली.
ही घटना आज बुधवार दि. २५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास बच्चे सावर्डे ते मोहरे रस्त्यावरती बसस्थानका जवळ घडली. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.