Tarun Bharat

Kolhapur; हातकणंगले तालुक्यात युवा सेनेचे कार्य उल्लेखनीय- आदित्य ठाकरे

Advertisements

कुंभोज वार्ताहर

हातकलंगले तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेचे कार्य उल्लेखनीय असून शिवसेना व युवा सेनेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन शिवसेना नेते व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले

ते हातकणंगले येथे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने हातकलंगले येथे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या संपर्क कार्यालयात भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी युवा सेनेचे प्रमुख माजी नामदार आदित्यजी ठाकरे यांचा सत्कार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण यादव ,अरविंद खोत, संजय चौगुले, युवा सेने सरचिटणीस डॉ. सत्यजीत तोरस्कर उद्योगपती विशाल कोरगावकर, सागर पुजारी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर झंजावती दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हातकणंगले येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले फटाक्याचे आताषबाजी व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला होता. यावेळी हातकणंगले तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भव्य स्वागतामुळे आपण भारावून गेलो असून. आता नव्या उमेदीने पक्षवाढीसाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सत्कार व स्वागतासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

सलग 75 तास लसीकरण मोहिम सुरू

Patil_p

मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक

Archana Banage

‘सुरेखा’ च्या यशाने आनंदला धनगरवाडा !

Archana Banage

दिघंचीत नारळाच्या झाडावर वीज पडली; जीवितहानी नाही

Archana Banage

शहापूर येथे अज्ञात युवकाचा निघृण खून

Archana Banage

कोरोनाला दुर्लक्षित करू नका, काळजी घ्या – जयंत पाटील

Archana Banage
error: Content is protected !!