37 रुग्णालयांचे परवाने रद्द
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हयातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयामधील जैविक कचरा, जमा करणे, तो विभक्त करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे या सर्व प्रक्रियेची चित्रफित (व्हिडीओ रेकॉर्डींग) तयार करावी व ती स्वतंत्र वेबसाईट निर्माण करुन त्या साईटवर अपलोड करावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.
संजयसिंह चव्हाण म्हणाले, वैद्यकिय कच्रयाचा प्रश्न गंभीर होत असून त्याबाबत सजग असणे गरजेचे आहे. रूग्णालयांनी उपलब्ध अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करुन त्यांचेकडे या संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण करण्याची जबाबदारी द्यावी. ग्रामपंचायत तसेच स्थानिक सूज्ञ नागरीकांनी देखील जैविक कचऱयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावतात का याकडे लक्ष द्यावे. दरम्यान यावेळी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार हॉस्पीटल परवाना नूतनीकरण न केलेल्या 37 रुग्णालयांचे परवाना रद्द करण्यात आले.