एनआयएचा हुपरीत छापा, दोघांना घेतले ताब्यात दोघांची चौकशी सुरु; इसिसची कनेक्शन
कोल्हापूर- राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या तपास यंत्रणेने रविवारी पहाटे कोल्हापूरात छापा टाकला. या मध्ये कोल्हापूरातील दोघा तरुणांना ताब्यात घेण्यात आले, असून या दोघांकडे चौकशी सुरु आहे. स्थानिक पोलीसांच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला असून या दोघांकडे कोल्हापूरातच एका ठिकाणी तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. इसिस संदर्भात कनेक्शन यातून समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दहशतवादी कारवायांविरोधात एनआयने रविवारी पहाटे देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड व कोल्हापूरातील हुपरी येथे हे छापे टाकण्यात आले आहे. संबंधित तरुण हा मुंबईचा असून त्याने हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे नातेवाईकाची खोली भाड्याने घेतली होती. त्यातून हा छापा टाकण्यात आल्याचे समजते.