तरूण भारत प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी राज्याभिषेक करण्यात आला. संपुर्ण राज्यभर हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘शिवस्वराज्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
खोची येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
खोची ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवशक राजदंड शिवस्वराज्य गुढी उभी करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये शिवाजी महाराज यांची प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सरपंच जगदीश पाटील, उपसरपंच रोहिणी पाटील, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थिती होते..
बुवाचे वठार
बुवाचे वठार ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक राजदंड शिवस्वराज्य गुडी उभी करून शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमापूजन सरपंच शोभा शिंदे व उपसरपंच शंकरराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी वासंती कुलकर्णी, सदस्य जावेद पाथरवट, कृष्णा वाठारकर, आक्रम शेख, यांच्यासह ग्रामंपचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
भेंडवडे
भेंडवडे ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक राजदंड शिवस्वराज्य गुढी माजी उपसरपंच सुहास देसाई यांच्या हस्ते उभी करण्यात आली. शिवप्रतिमा अशोक एडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच काकासाहेब चव्हाण, ग्रामविकास अधिकारी एस.यु.चव्हाण तसेच आरोग्यसेविका विमल सुवासे, लता कांबळे, आशा स्वयंसेविका, हणमत महेकर, ग्रामंपचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सैनिक टाकळी
शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त सैनिक टाकळी ग्रामपंचायतमध्ये शिवशक राजदंड स्वराज्यगुडी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी सरपंच सौ हर्षदा पाटील यांनी आपल्या मनोगतात याच दिवशी शिवशकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले व शिवकाल गणनेला प्रारंभ झाला तो हा शुभदिन होय महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्ताना नामोहरम करून स्वतःच्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची ओंजळ सुख समृद्धीने भरली असे मनोगत करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.