Tarun Bharat

शाहूवाडीत अनैतिक संबंधास अडथळ ठरत असल्याने पतीचा खून

शाहुवाडी प्रतिनिधी

अनैतिक संबंधास अडथळा करून शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून पती प्रकाश पांडुरंग कांबळे वय ५२ सध्या रा.नांदगाव पैकी मांगुरवाडी ता.शाहूवाडी मुळगाव लोळाणे पो. निनाई परळे याचा   पत्नी  वंदना प्रकाश कांबळे वय ५० हिने त्याचे डोके चि-यावर आपटून, दोरीने गळफास लावून त्याचा गुप्त भाग सुरीने कापून खून केल्याची  कबुली दिली.याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या विरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.हि घटना १५ मे रोजी रात्री ९.३०वा.नांदगाव पैकी मांगुरवाडी ता. शाहूवाडी येथे घडली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की,पती प्रकाश कांबळे यांने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची वर्दी पत्नी वंदना कांबळे हिने शाहूवाडी पोलिसांत दिली होती.यानुसार मयत दाखल करण्यात आले होते.पोलिस इन्केट  पंचनामा करत असताना मयताच्या डोक्यात  गंभीर जखम,गळा आवळ्याच्या खुणा व गुप्त भागावर जखमा आढळल्याने हा गळफास नसून खून केला असल्याच्या दिशेने पो.नि.विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू करून मयताची पत्नी वंदना हिच्याकडे कसून तपास केला असता तिने नवरा अनैतिक संबंधास अडथळा ठरत होतो,तो शिवीगाळ करत असल्याच्या रागातून त्यांचे डोके चि-यावर आपटून,त्यास गळफास लावला व त्यांचा गुप्त भाग सुरीने कापून त्यास जिवे ठार मारल्याची आज शाहूवाडी पोलिसांत कबुली दिल्याने पत्नी. वंदना कांबळे हिच्या विरोध पोलिसांत खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे.याप्रकरणी मयताचा भाऊ प्रविण पांडुरंग कांबळे यांने फिर्याद दिली आहे.हा प्रकार नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे मयताच्या राहत्या घरी १५ मे रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास घडला.दि १६ मे रोजी खून झाल्याचे उघडकीस आले.अधिक तपास पो नि.विजय पाटील करिता आहेत.

Related Stories

आरके नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली चार दुकानं

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : गोपाळराव पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Archana Banage

कल्याण-डोंबिवलीच्या ‘त्या’ निर्णयास तुर्तास स्थगिती

Tousif Mujawar

आमदार गीता जैन शिवसेनेत, मातोश्रीवर पार पडला पक्षप्रवेश

Tousif Mujawar

काँग्रेस नेता व आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

पीग आयर्न दरवाढीला तात्पुरता ‘ब्रेक’

Archana Banage