प्रतिनिधी /म्हापसा
कोलवाळ येथून अपहरण करून लुटून लॅपटॉप चोरून नेल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोघां संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून दोन 80 हजार रुपयांचे लेनोओ लॅपटॉप व चोरलेले 3500 रुपये व गुह्यात वापरलेली श्विफ्ट कार जप्त केली आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी मिलींद नाईक (49) रा. पेडणे व प्रकाश शेटकर वय 39 रा. जलसंचन कॉटर्स कोलवाळ येथे राहणारे दोघांना ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा गुप्ता रा. मुंबई हे एनपीसीआय चे कोलवाळ येथे सर्वेक्षण करीत असताना दि. 25 सप्टेंबर रोजी दु. 3.30व ा. कोलवाळ भागात वरील दोघे तेथे आले. एकटा स्कूटरने तर दुसरा श्विफ्ट कारने येऊन मिलींदने जबरदस्तीने रामा गुप्ता याला स्कूटरवर बसविले व जेलजवळ आणून श्विफ्ट कारमध्ये घालून त्याला धमकी देत त्याच्याकडूल 2 लॅपटॉप व रोख रुपये 3500 जबरदस्तीने धमकी देऊन काढून घेतले व करासवाडा येथे श्विफ्ट नेऊन तेथून गुप्ता याला बाहेर टाकून तेथून पळ काढला.
घटनेची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांना दिल्यावर निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार परब, हवालदार रामा नाईक, रोहीत शेटगावकर, दत्ता गावस, आनंद केरकर, आश्वेकर राऊत यांनी पथक निर्माण करून 26 रोजी वरिल दोघां संशयितांनी ताब्यात घेतले. दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. संशयित प्रसाद शेटकर हे सरकारी नोकरीस असून ते म्हापसा आयटीआय मध्ये शिपाई (प्यून) म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याबाबत अहवाल पोलिसांनी खात्यात दिलेला आहे. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंदार परब याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.