Tarun Bharat

मुंबईचा कोंडवाडा!

थंडीत प्रदूषणाचे प्रमाण नेहमीच वाढते. सध्या प्रदूषणाने मुंबई शहराची मुस्कुटदाबी केली आहे. जलप्रलयापासून सुटका करण्यासाठी मुंबईत पंपांची सोय करण्यात आली. कोविडपासून आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यात आली. ‘सफर’ प्रकल्प हवेच्या दर्जाची नोंद देत इशारा देत आहे. सफर प्रकल्पाने दिलेला इशारा हवा प्रदुषण संबंधित विभागांनी गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळेच मुंबईचा प्रदूषणाने जो काही कोंडवाडा केला आहे, यावर संबंधित विभाग आणि सरकारकडे काय उपाययोजना आहेत याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत…

मध्यम, वाईट, अतिशय वाईट अशा शेऱयांनी सध्या हवेचा दर्जा नोंद करणाऱया सफर प्रकल्पाच्या सुचना फिरु लागल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्येही थंडीसह प्रदूषणाची समस्या सध्या सतावत आहे. गुलाबी थंडी कोणाला नकोयं. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी थंडी मुंबईत सुरु झाल्यावर थंडीत उद्भवणारी प्रदूषणाची समस्या सतावू लागली आहे. मुंबईसारख्याच राज्यातील इतर शहरांमध्ये देखील विशेषतः थंडीत प्रदूषणाची समस्या उद्भवतेच. जोपर्यंत थंडी जात नाही तोपर्यंत प्रदूषकांचा वावर वातावरणात असतो. याला शास्त्राrय कारणे दिली जातात. थंडीमुळे वाऱयाची स्थिती मंदावते. समुद्राच्या पृष्ठभागावरील प्रवाह थंड होतो. याला ला निना म्हटले जाते. वाऱयाची गती थंड झाल्याने प्रदूषके वातावरणाबाहेर जात नाहीत. प्रदूषके वातावरणात राहिल्यास ढगाळ सदृश्य वातावरण निर्माण होते. पीएम 2.5 आणि पीएम10 सारख्या प्रदूषक कण थंडीमुळे परस्परांना जोडले जातात. यातून त्यांचे वजन वाढते. हे जड झालेल्या प्रदूषकांचे कण वातावरणाच्या खालच्या थरात फिरत राहतात. वातावरणाबाहेर जात नाहीत.

प्रदूषणाला थंडीसह दुसऱया कारणात वाऱयाच्या वेगाचे दिले जाते. वाऱयाचा वेग नसल्याने हवेचा दर्जा खालावला असल्याचे वैज्ञानिक सांगत आहेत. मात्र हे झाले वातावरणीय वैज्ञानिक अधिष्ठान असलेले कारण. यापुढे जाऊन प्रदूषण वाढल्यास किंवा ते दीर्घकाळासाठी स्थिरावलेले †िदसल्यास आपल्याकडे काय योजना आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे. 

दरम्यान सोमवारी दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) 242 इतका नोंदवला. या निर्देशांकाला वाईट असा शेरा देण्यात आला. मात्र सोमवारीच मुंबईतील स्थिती पाहिल्यास मुंबई संपूर्ण शहरात हवा दर्जा निर्देशांक हा 306 वर होता. हे म्हणजे दिल्लीहून मुंबई प्रदूषणात कैक पुढे जात आहे. गेल्या काही आठवडय़ापासून मुंबईतील हवा बिघडली आहे.

आतापर्यंत प्रदूषणात दिल्ली आघाडीवर असताना गेल्या आठवडय़ापासून एक ते दोन वेळा मुंबई प्रदूषणात दिल्लीहून पुढे गेल्याचे दिसून आले. यातून मुंबईकरांना प्रदूषणापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या सल्ल्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, संवेदनशील रूग्ण, फुफ्फस विकारी रूग्ण, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना इशारा दिला जात आहे. म्हणजे नेमकं काय करायचे तर घराबाहेर पडणे टाळावे, मास्क वापरावा असं सांगितलं जातं आहे.

सफर या हवा दर्जाचे नोंद करणारा प्रकल्प असून हवेचा दर्जा खालावल्यास इशारा देण्याव्यतिरिक्त या प्रकल्पाच्या अखत्यारीत काही नाही. ‘सफर’ किमान इशारा तरी देत आहे. खरं म्हणाल तर सफर प्रकल्पाने दिलेला इशारा हवा प्रदूषण संबंधित विभागांनी गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही.

दिल्लीतील हवा बारमाही प्रदूषित असते असं दिल्लीकर मित्र सांगतात. मुंबई-पुण्याच्या हवेत प्रदूषकांचे प्रमाण अधिक वाढते. म्हणजे इतर मोसमात प्रदूषण नसते असे नाही. मात्र इतर मोसमांत प्रदूषके वातावरणाबाहेर लवकर जाण्यास मदत होते. हिवाळ्यात तसें होत नाही. वाऱयाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच थंडीमुळे प्रदूषक जड होऊन वातावरणाची खालची पातळी गाठतात. प्रदूषके वातावरणात राहिल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढते. हवेचा दर्जा खालावतो. त्यातूनच सफर प्रकल्पाकडून हवेच्या दर्जाला मध्यम, वाईट, अतिशय वाईट असे शेरे दिले जात आहेत. मुंबईच्या वातावरणात धूळ, धुरकं आणि पीएम 2.5 तसेच 10 चे प्रमाण वाढत आहे. यातून मुंबईकरांना आरोग्याचा इशारा देण्यात येत आहे.

यामुळे सध्या मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ञ सांगतात. तर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण सध्या 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे. सर्दी, खोकल्यासह, श्वसन विकाराचे रुग्ण उपचार घेण्यास रुग्णालयात येतात. ज्यांना आधीपासून फुफ्फुस विकार होते, लहान किंवा ज्येष्ठ त्यांना या वातावरणात बरेचसे दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत. तसेच श्वसन मार्गाच्या दोन्ही प्रकारचे संसर्ग दिसत आहेत.

दिल्लीत एअर प्युरीफायरचा विचार

दिल्ली प्रदूषणासाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र गेल्या नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील प्रदूषण वाढत असलेल्या भागात एअर प्युरीफायर बसविता येतात का याचा विचार करणे सुरुवात झाली आहे. या प्युरिफायरमुळे हवेतील पीएम2.5 तसेच 10 सारख्या प्रदूषकांना कमी करता येते. तसेच धुरक्यावरदेखील नियंत्रण मिळवू शकतो. दिल्ली असा विचार करत असताना मुंबईसारख्या शहरात हिवाळ्यातील प्रदूषणावर असा काही मार्ग शोधता येईल का याची चर्चा होणे आवश्यक आहे.

मुंबईतील प्रदूषण दिर्घकालीन नसते असा तज्ञांचा अभ्यास आहे. यावेळी मात्र प्रदूषणाने जादा काळ घेतला असून अभ्यासकांच्या मते या हिवाळ्यात गेल्या महिन्यापासून प्रदूषकांचे वातावरणातील प्रमाण घट्ट होताना दिसून येत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील हवामानाच्या प्रत्येक घटकांत बदल होत असून तो मानवी जीवनाला असह्य करणारा आहे. जगातील काही देशांपासून भारताच्या उत्तर राज्यांमध्येही सध्या †िहमवर्षाव अधिक होत आहे. उत्तरेकडील शीत लहरींमुळे महाराष्ट्र राज्यातही थंडी वाढती आहे. ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज करण्यात येत आहे. म्हणजे प्रदूषणही थंडीत ठाण मांडून राहणार. त्यामुळेच यावरील उपाययोजनांवर गंभीर विचार होणे गरजेचे आहे.

दरम्यान काही विशेष मुद्यांवर विचार करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मुंबई महानगरपालिका प्रदूषण कमी करण्यासाठी आदेश देते. प्रदूषण करणाऱया कारखान्यांना तसेच उद्योगांना किमान थंडीच्या मोसमात नियंत्रणासंबंधित सुचना देऊ शकते. त्याचवेळी हवा शुद्धीकरण यंत्रे किंवा त्या धर्तीवर वापरण्यासारख्या साधनांचा विचार करुन मुंबईकरांना दिलासा देऊ शकते. निव्वळ थंडी वाढल्याने प्रदुषण वाढले हे वैज्ञानिक कारण देऊन चालणारे नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडी किती काळ राहिल याचा अंदाज नसून थंडी मोसमाव्यतिरिक्त देखील शहरांमधील प्रदूषणाचा प्रश्न कायम असतो. अशा प्रश्नाचा स्वीकार करुन निराकारण करणाऱया उपाययोजनेकडे इतक्यातच वळले पाहिजे. अन्यथा प्रदूषणातून मुंबईकरांचा कोंडमारा होणे चुकणारे नाही….

राम खांदारे

Related Stories

‘आप’ जिंकणार गुजरात निवडणूक!

Patil_p

काँग्रेसः तेल गेले, तूप गेले

Patil_p

अमृत हाणोनि लत्ताघातीं

Patil_p

युक्रेनवरील रशियन आक्रमण फसण्याच्या मार्गावर

Patil_p

भय इथले संपत नाही….

Patil_p

गोवा- सरकारी जावयांचे राज्य?

Omkar B