Tarun Bharat

कोकण रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले!

कोकिसरे-वैभववाडीनजीक ‘कोकणकन्या’ इंजिन बिघाडाचा परिणाम

प्रतिनिधी/ खेड

कोकण रेल्वे मार्गावरील कोकिसरे-वैभववाडी स्थानकानजीक मुंबईहून मडगावला जाणाऱया कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास बिघाड झाला. या बिघाडाचा 6 रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होवून प्रवाशांना रखडपट्टीला समोर जावे लागले. कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल 4 तास उशिरानेच धावली.

25 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी-विन्हेरे स्थानकादरम्यान तुटलेल्या ओव्हरहेड वायरमुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. सलग 4 दिवसानंतर कोकण रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आले होते. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणानंतर रेल्वेला पहिला फटका बसलेला असतानाच पुन्हा कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडाने  कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत होवून प्रवाशांचे हाल झाले.

कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिन बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस 1 तास, राजधानी एक्सप्रेस 2 तास उशिरानेच धावल्या. सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसही दीड तास विलंबाने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. या पाठोपाठ सीएसएमटी मुंबई-मंगळूर एक्सप्रेस 1 तास, नेत्रावती एक्सप्रेस 2 तास तर कोच्युवेली एक्सप्रेसही 4 तास विलंबानेच धावली. कोकण रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना पुन्हा फटका बसल्याने मनस्तापाला समोर जावे लागले. त्या-त्या रेल्वेस्थानकात प्रवाशांना तासन्तास तिष्ठत बसावे लागले.

Related Stories

अपघातग्रस्त कंटेनर नदीतून बाहेर काढला

NIKHIL_N

आत्मनिर्भर अभियान पॅकेज चाकरमान्यांपर्यंत पोहोचविणार!

NIKHIL_N

हेवाळे येथील पाणलोट कमात अपहार!

NIKHIL_N

आचरा ग्रामपंचायत तर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा गौरव

Anuja Kudatarkar

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक भास्कर सावंत यांचे निधन

NIKHIL_N

रेवंडी खाडीपात्रात पुन्हा अतिक्रमण!

NIKHIL_N