Tarun Bharat

कुडचडेतील ‘संकल्प थिएटर्स’चा कोकणी नाटय़महोत्सव 12 पासून

सहा नाटके सादर होणार, 19 रोजी समारोप सोहळा

वार्ताहर /कुडचडे

कुडचडे येथील संकल्प थिएटर्सतर्फे आयोजित 29 वा कोकणी नाटय़महोत्सव यंदा सोमवार 12 ते सोमवार 19 डिसेंबरपर्यंत होणार असून या महोत्सवात एकूण सहा नाटके सादर केली जातील. त्यासाठी पुढीलप्रमाणे समिती निवडण्यात आली आहे-स्वागताध्यक्ष-सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कार्याध्यक्ष-संदेश शेणवी काकोडकर, संकल्प थिएटर्सचे अध्यक्ष-नवीन खांडेकर, सचिव-मंगलदास भट, खजिनदार-सुनील नाईक.

मंडप समिती-प्रमोद नाईक, योगेंद्र नाईक, अवधुत देसाई, दुर्गानंद परब, शिवा नाईक, नारायण शेटय़े, सतीश लोटलीकर, दत्तात्रय नाईक, सुभाष नाईक, वीज व्यवस्था-नागेश नाईक, निधी समिती-मारियो बार्रेटो, नवीन खांडेकर, राजस काकोडकर, मुकुंद नाईक, पृथ्वी बोरकर, शशिकांत वळडंवकर, अल्पोपहार समिती-गुरुदास नाईक, प्रकाश नाईक, राजेंद्र नाईक, प्रसिद्धी समिती-समीर भाट, मनोदय फडते, संतुष्ट नाईक, क्रिस्तानंद पेडणेकर, हनुमंत वस्त, समारोप कार्यक्रम समिती- नंदेश वस्त, संदेश काकोडकर, राजू नाईक, सजावट समिती-यशवंत आदेल, तानाजी गावकर,,राजू नाईक, स्वागत समिती-बीना नाईक, राखी खांडेकर, सोनल सगलानी, मुग्धा भिसे, निकिता नाईक मडगावकर, रुबिया काकोडकर, छपाई समिती-मंगलदास भट, सुनील नाईक.

कला व संस्कृती संचालनालय तसेच रवींद्र भवन, कुडचडे यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया या महोत्सवाचा शुभारंभ 12 रोजी संध्याकाळी 7 वा. नागेशीं येथील रवळनाथ प्रासादिक नाटय़मंडळ संस्थेच्या ‘कमॉन वासू चिअर अप’ या नाटकाने होणार आहे. 13 रोजी रूद्र क्रिएशनतर्फे ‘तेंगशेर कावळो घोवाक दुवाळो’, 14 रोजी श्री विठ्ठल शांतादुर्गा कला मंचाचे ‘रूची ऑल दि बेस्ट’, 15 रोजी रंगवेद, सावईवेरे यांच्यातर्फे ‘रे मना’, 16 रोजी कला चेतना संस्थेचे ‘शुभ टिंगल सावधान’, तर 17 रोजी नागेश महारूद्र नाटय़संस्था, नागेशी यांच्यातर्फे ‘भविष्यमान भवः’ हे शेवटचे नाटक सादर केले जाईल. 

महोत्सवातील नाटकांसाठी संकल्प थिएटर्सतर्फे मोफत प्रवेशिका वितरित केल्या जाणार आहेत. समारोप सोहळा 19 रोजी दुपारी 3.30 वा. होणार असून या कार्यक्रमात नामवंत नाटय़कलाकारांचा सत्कार होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी संकल्प थिएटर्सच्या सदस्यांनी स्थापलेल्या चेतना या दिव्यांग मुलांसाठीच्या शाळेच्या मुला-मुलींचे विविध कार्यक्रम सादर केले जातील. यंदाही हा महोतव यशस्वी करण्यासाठी नाटय़रसिकांनी उत्स्फूर्त दाद द्यावी, असे आवाहन संकल्प थिएटर्सच्या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष असलेले मंत्री नीलेश काब्राल आणि कार्याध्यक्ष संदेश शेणवी काकोडकर यांनी केले आहे.

Related Stories

कोलव्यात दोन घरांना आग

Patil_p

लसीकरणापूर्वी रक्तदान करा

Amit Kulkarni

दाबोळीत मंत्री माविन गुदिन्हो विरूध्द प्रतिस्पधी उमेदवार कोण ?

Amit Kulkarni

सॅरिनियोची एफसी गोवाला सोडचिठ्ठी तर अमरजीत ईस्ट बंगालला

Amit Kulkarni

विकासाची क्रांती पुढे नेऊया

Amit Kulkarni

कोरगाव येथे मराठी दिन साजरा

Amit Kulkarni